मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगर 3 ची तयारी? उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला होता. सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा सर्वात मोठा धक्का होता. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. हा एकनाथ शिंदे यांचा फोटो असून, त्यावर वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर 3.0 राबवलं जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र दुसरीकडे महायुतीला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. या खासदारांनी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खासदारांची संख्या वाढली आहे. राज्यात महायुतीमध्ये आता सर्वाधिक खासदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.
दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा आणखी एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांच्या फोटोसोबत वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या फोटोवरून चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3 राबवणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.