एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईसाठी घेतला गेमचेंजर निर्णय; गणेश नाईकांना डावलल्याने चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंनी क्लस्टर योजनेबाबत नवी मुंबईसाठी गेमचेंजर निर्णय घेतला आहे. शिंदेंनी गणेश नाईकांना डावलून निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईसाठी घेतला गेमचेंजर निर्णय; गणेश नाईकांना डावलल्याने चर्चांना उधाण
eknath shinde news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 2:40 PM

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहारातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता या धोकादायक इमारतींसाठी सरकारने क्लस्टर योजना लागू केली आहे. एकापेक्षा जास्त हौसिंग सोसायट्या एकत्र पुनर्विकास करत असतील, तर त्यांना क्लस्टर योजनेत सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयाने धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. परंतु या निर्णयाच्या आडून शिंदेंनी मंत्री गणेश नाईक यांना धक्का दिल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदेंची गणेश नाईकांवर कुरघोडी?

Loading...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्या नात्यातील कटुता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली आहे. नवी मुंबईत दोन्ही नेत्या समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जातात. नवी मुंबईत गणेश नाईक हे क्लस्टर योजनेच्या विरोधात होते. परंतु आता एकनाथ शिंदे यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे. शिंदेंनी निर्णय घेत गणेश नाईकांवर कुरघोडी केल्याी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला गणेश नाईकांचा प्रखर विरोध होता. गणेश नाईकांची नवी मुंबईच्या महापालिकेवर सत्ता आहे. त्यांनी पालिकेत ब्रेक लावणारा ठराव पास केला होता. शहरात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे मुलभूत गरजांवर ताण येईल, असं कारण देत पालिकेने क्लस्टरला विरोधा दर्शवला होता. परंतु पालिकेचा ठराव एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने फेटाळला आहे.

एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर नाईक काय बोलणार?

क्लस्टर योजनेतून सर्वसामान्यांना चांगली घरे मिळतात, असे म्हणत नगरविकास खात्याने क्लस्टर योजनेला ग्रीन सिग्नल दिला आहे. क्लस्टर योजनेला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाच्या विरोधात गणेश नाईक काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. तसेच एकनाथ शिंदे यांच्या विभागाने घेतलेल्या निर्णयावर गणेश नाईक काय परवानगी घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us