पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा, सगळं सांगितलं
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, दरम्यान या भेटीनंतर आता शिंदे यांची पहिली प्रक्रिया समोर आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातून काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आजची भेट ही सदिच्छा भेट होती, असं या भेटीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शिंदे?
आज सदिच्छा भेट होती. संसद सुरू होतं तेव्हा खासदारांना भेटायला येतो. पंतप्रधांनांनी वेळ दिला, त्यांना भेटलो. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा झाली. एनडीएचे शिवसेनेचे खासदार आहेत. सहा नवीन लोकं आहेत, त्यांच्याशी मोदींनी चर्चा केली. चहा घेण्यासाठी बोलावलं होतं. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे, त्याचा बराच फायदा होईल. आमच्या खासदारांना विकासासाठी त्याचा फायदा होईल, असं या भेटीनंतर शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झीचं कौतुक केलं आहे. यावर देखील यावेळी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. युवा आपल्या देशाचं भविष्य आहे. उद्याचं भविष्य आहे. मोदी देखील तरुणांशी चर्चा करत आहेत, आपण पाहत आहोत. मोदींनी नेहमीच तरुणांना प्राधान्य दिलं आहे. त्यांच्यासाठी शिक्षण, स्किल डेव्हल्पमेंट, स्टार्टअप आदींवर काम केलं आहे. तरुण देशाचं भविष्य आहे हे भागवत म्हणाले, ते योग्य आहे. युवा देशाची शक्ती आहे. विकसित भारतात तरुणांचं मोठं योगदान असेल.
सभागृह सुरू आहे. तिथे चर्चा झाली पाहिजे. आधी प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राजीनामा झाला. आंदोलक तरुण आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. पण विरोधक सभागृहात चर्चा करायला तयार नाहीत. सरकार तरुणांसोबत आहेत, तरुणांचा आदर करूनच प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. सर्वांनी मिळून देशाला पुढे नेलं पाहिजे, संसदेत बोललं पाहिजे, पण त्यावर ते बोलत नाहीत. ते फक्त राजकारण करत आहे, हे चुकीचं आहे. असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.