मोठी बातमी! उद्योजक राणा सूर्यवंशी पुण्याच्या रुग्णालयातून फरार, पोलिसांकडून शोध सुरू
मोठी बातमी समोर येत आहे. राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी हे पोलिसांच्या चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून फरार झाले आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे. राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी हे पोलिसांच्या चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून फरार झाले आहेत. बारामतीमध्ये सूर्यवंशी याच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या कथिक हल्ल्याप्रकरणात पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येणार होती, मात्र त्यापूर्वीच ते पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून फरार झाल्याची बातमी आता समोर आली आहे. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वी राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात 18 ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळानजीक आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी याने बारामती पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणात कटात सहभागी असलेल्या राणा सूर्यवंशीच्या निकटवर्तीयांवर व साथीदारांवर बारामती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याच कथित हल्ल्याप्रकरणात राणा सूर्यवंशी यांची देखील चौकशी होणार होती, मात्र या चौकशीपूर्वीच ते फरार झाले असून, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत.
बारामती विमानतळानजीक अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी यांनी केली होती. त्यानंतर त्यांना पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलं होतं. त्यांची या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी होणार होती. परंतु पोलिसांच्या चौकशीपूर्वीच राणा सूर्यवंशी हे पुण्याच्या रुबी रुग्णालयातून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना समोर येताच पुण्यात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.
कारण अस्पष्ट
दरम्यान राणा सूर्यवंशी हे पुण्याच्या रूबी रुग्णालयातून फरार का झाले, याचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. पोलीस चौकशीपूर्वीच ते फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. बारामती विमानतळ परिसरात आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला होता.