पुणे ‘शिक्षक’ची जागा सगळ्यांना वाटतंय भाजप जिंकेल; पण निकाल उलटा लागू शकतो, कारण?

पुणे 'शिक्षक'ची जागा भाजप जिंकणार असल्याचा मंत्र्यांकडून केला जात आहे. परंतु या मतदारसंघात यंदा मताची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे निकाल उलटा लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुणे शिक्षकची जागा सगळ्यांना वाटतंय भाजप जिंकेल; पण निकाल उलटा लागू शकतो, कारण?
BJP
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 11:10 AM

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडलं. खरंतर या निवडणुकीआधीच दोन्ही मतदारसंघात उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी एकतर्फी म्हणजे 50 टक्क्यांहून अधिक मतांनी उमेदवार निवडून येतील, असा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थकांकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत. दोन्ही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी यंदा वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीचा काय निकाल लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदानानंतर मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. यंदा पुणे पदवीधरसाठी 62.78 टक्के, शिक्षकसाठी 85.87 टक्के मतदान झालं आहे. गत निवडणुकीपेक्षा मतदानाच्या टक्केवारी वाढीमुळे निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पदवीधर मतदारसंघांचे 47 उमेदवार तर 30 शिक्षक उमेदवारांचे भविष्य हे मतपेटीत बंदिस्त झालं आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल कसा लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. एकीकडे शिक्षक मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढल्याने निकाल उलटा लागू शकतो,  अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. परंतु कोण जिंकणार, हे अधिकृत निकाल जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.

Loading...

दोन्ही मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचाराचं समीकरण कसं होतं?

पदवीधरसाठी भाजपकडून डॉ. स्मिता जाधव, शरद पवार गटाकडून हर्षदा देशमुख-जाधव, तर शिवसेनेकडून बंडखोरी करत सुनील मोदी निवडणुकीच्या रिंगणात होते. शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे यांच्यापुढे काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचे आव्हान असले,तरी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिंदे गटाने पाठिंबा दिला होता. तर माजी आमदार दत्ता सावंतही निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे चुरस वाढली होती. मतदार नोंदणीपासून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत राजकीय पक्षांनी यंत्रणा सक्रिय ठेवली होती.

हर्षदा जाधव यांचे सासरे कल्याण जाधव म्हणाले, ‘पदवीधरांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी एक सक्षम उमेदवाराला निवडून देणे गरजेचे आहे.  शरद पवार साहेबांनी नेहमी महिलांना संधी देण्याचं काम केलं आहे.   27 ऑक्टोबर रोजी व्हिजन असलेल्या उमेदवाराला पदवीधर निवडून देतील. हर्षदा देशमुख 27 तारखेला विजयी होतील, असा दावा देखील कल्याण जाधव यांनी केला. तर शिक्षक मतदारसंघातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याने कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us