मोठी बातमी! पुणे हादरलं, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे, या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मोठी बातमी! पुणे हादरलं, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2025 | 6:09 PM

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. पुण्यात पोलीस कॉन्स्टेबलनं आपलं जीवन संपवलं आहे. स्वरुप जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. स्वरुप जाधव हे मुळचे कोल्हापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. 2023 मध्ये पुणे शहर पोलीस दलात त्यांची निवड झाली होती. मात्र त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबल स्वरुप जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. ते मुळचे कोल्हापूरचे होते.  2023 मध्ये पुणे शहर पोलीस दलात त्यांची निवड झाली होती. सध्या त्यांची नियुक्ती  पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात होती, मात्र त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

कारण अस्पष्ट

दरम्यान स्वरुप जाधव यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी आपल्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. ते मुळचे कोल्हापूरचे होते.

धुळे जिल्ह्यातही आत्महत्या  

दरम्यान दुसरीकडे धुळे जिल्ह्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथे एका २० वर्षीय बी. फार्मसीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.  मोबाईल हॅक करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर (२०), असे आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर तालुक्यातील थाळनेरजवळ असलेल्या ताजपूरी गावातील सनेर कुटुंबाचा एकूलता एक मुलगा असलेल्या किशनने राहत्या घरी साडीने गळफास घेतला. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मृत किशनचा मोबाईल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर तो नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.