
मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस उरले असून त्याआधी आता प्रचाराने मोठा वेग पकडला आहे. महायुतीचाच पुन्हा विजय होईल असा दावा करत नेत्यांनी प्रचाराचा झंझावात कायम राखला आहे. याचदरम्ायन मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्याही विविध ठिकाणी सभा, मुलाखती सुरू असून नुकताच त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस अनेक विषायंवर दिलखुलास बोलले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत त्यांच्यावर निशाणा साधला.
म्हणून त्यांनी आडमुठी भूमिका घेतली
कोस्टल रोड आणि इतर प्रकल्पांवरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईवरून मुख्यमंत्री बोलले. यांच्या हातात असतं तर त्यांनी धारावी लुटली असती. हे अरुण्यरुदन करत आहे. ते त्यांच्या हातून गेलं. माल कमवण्याचं स्वप्न तुटलं. हे भंग झालेले प्रेमी आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. कोस्टल रोडवरूनही ते स्पष्ट बोलले.
संकल्पना त्यांचा ( उद्धव ठाकरे) विषयच नाही. ही संकल्पना आधीचीच होती, पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हा ते म्हणायचे आम्ही कोस्टल रोड करू. हे पण तेच म्हणायचे. २५ वर्षात कोस्टल रोड का नाही झाला असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. उद्धवजी राजकारणात नव्हते तेव्हा कोस्टल रोडची संकल्पना नव्हती. देशाच्या कायद्यात कोस्टल रोडची परवानगी नव्हती. आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. त्यांना रेक्लेमेशन करून कोस्टचं कसं संरक्षण करू शकतो हे दाखवलं. कायद्यात बदल केला. दोन वर्ष लागली. तीन पर्यावरण मंत्री बदलले. पाच मिटिंग झाल्या. प्रत्येकवेळी अडचण यायची. ते म्हणाले आम्ही रिक्लेमेशनला परवानगी देतो. पण दोनसे अडीचशे स्क्वेअरफुटाची जागा तयार होईल. ती रिअल इस्टेटला वापराल. त्यावेळी प्रतिज्ञापत्र दिलं. त्यात गार्डन आणि वॉकिंगसाठी जागा करू म्हणून सांगितलं.
एक दिवस अचानक..
बीएमसी, एमएमआरडीए आणि एमएमआरसी करायला तयार होते. उद्धव ठाकरे म्हणाले हा प्रकल्प बीएमसीला द्या. आम्ही दिलं. बीएमसीला दिल्यावर काही लोक हायकोर्टात आले. तिथे आम्ही लढलो. एक दिवस अचानक उठून उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं. मला कमिश्नरचा फोन आला, त्यांनी मला सांगितलं की उद्धव ठाकरे असं असं करत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे कुणीच नव्हते, कोणत्याही पदावर नव्हते. तेव्हा कमिश्नर म्हणाले, आम्ही पुन्हा ऑफिशियल भूमिपूजन करू. पण मी म्हटलं नाही, मला श्रेय घ्यायचे नाही. पुन्हा भूमीपूजन करणार नाही. पण मी उद्घाटन मीच करणार आहे असंही मी तेव्हा सांगितलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ते कोत्या मनाचे
कल्याणच्या उद्घाटनाला मी त्यांचे सर्व मंत्री बोलावले. पालकमंत्री बोलावले. उद्धव ठाकरे कोणत्या संवैधानिक पदावर होते. अशा प्रकारचे उद्घाटन करण्याचा त्यांना अधिकार होता का नव्हता. मलाच होता. मी मुख्यमंत्री होतो. मी मोठं मन दाखवलं. हे कोत्या मनाचे होते. यांच्या मनात २०१७चं शल्य होतं. आम्ही वेगळे लढलो. त्यांना वाटलं की हे भाजपवाल्यांची काय औकात आहे. ते काय माझ्या पुढे लढतील असं त्यांना वाटलं. पण जेव्हा त्यांच्या 84 आणि आमच्या 82 जागा आल्या तेव्हा त्यांना समजलं. आमचा माझा महापौर बनत होता पण मी सोडलं. ते शल्य उद्धव ठाकरे यांचा मनात होतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.