Tukaram Mundhe : मुलाच्या सवयीबद्दल स्पष्टच बोलले तुकाराम मुंढे, थेट म्हणाले, माझा मुलगा कधीच..

एफडीएचा कारभार तुकाराम मुंढे यांनी आपल्या हातात घेतला. तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोठी कारवाई केली जात आहे. त्यातच तुकाराम मुंढे यांनी नुकताच मोठा खुलासा केला. आपल्या मुलांबद्दल बोलताना पहिल्यांदाच तुकाराम मुंढे दिसले.

Tukaram Mundhe : मुलाच्या सवयीबद्दल स्पष्टच बोलले तुकाराम मुंढे, थेट म्हणाले, माझा मुलगा कधीच..
Tukaram Mundhe
| Updated on: Nov 07, 2026 | 9:57 AM

राज्याचे अन्न व औषध विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात कारवाया होत आहेत. त्यातच तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलांबद्दल मोठे विधान केले.तुकाराम मुंढे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. तुकाराम मुंढे म्हणाले की, मी माझ्या मुलांसोबत कायमच चर्चा करतो. आमच्यात कोणताही विचार न करतात चर्चा होते. माझे मुले मला मनमोकळेपणाने बोलतात. माझ्या मुलाच्या मित्रांच्या बर्थडे पार्ट्या असतात. तिकडे मद्यप्राशन केले जाते. पण अशा पार्ट्यांमध्ये माझा मुलगा कधीच जात नाही. याबाबत त्याचे विचार स्पष्ट आहेत की, ज्या पार्टीत मद्यप्राशन केले जाते, तिथे मी जाणार नाही.

माझ्या मुलाच्या मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या मोठ्या होतात. तिकडे जायचे की, नाही तो त्याचा निर्णय असतो. माझ्या मुलाचा वाढदिवस घरीच असतो. एक तर आम्ही घरी करतो किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी जाऊन साजरा करतो. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आठ ते दहा मित्र येतात. सर्वकाही अगदी मोजकेच असते. माझ्या मुलाची विचारसरणी तशी आहे.

Loading...

ज्या मित्राच्या पार्टीत मध्यसेवन होते, तिथे जायचे नाही. मी ड्रिंक करत नाही. माझ्या घरी कोणीही ड्रिंक करत नाही. त्यामुळे त्याच्यावर आमच्याकडे पैसे खर्च होत नाही. आमच्या घरातच कोणी ड्रिंक घेत नाही म्हणून ते इतरांना देण्याचा प्रश्नच येत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी कितीही पैसे लागू दे, त्याचा काही प्रश्चच नाही. मी कितीही पैसे शिक्षणावर खर्च करण्यास तयार आहे.

मला माहिती नाही की, माझे मुले भविष्यात किती पैसे कमावतील किंवा नाही हे मला माहिती नाही. पण नक्कीच मला एका गोष्टीची खात्री आहे की, ते स्वत:च्या मेहनतीवर आणि योग्यच मार्गाने पैसे कमावतील. याबाबत मला आनंदही असेल. यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी म्हटले होते की, माझ्या सततच्या बदलीचा माझ्या मुलांवर कायमच परिणाम झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us