वरिष्ठ अधिकाऱ्याची बदल होताच महिला पोलीस शिपायाने पोलीस स्टेशनमध्ये फोडले फटाके , पती आयपीएस असल्याचंं सांगत थेट धमक्या..
मुंबईच्या अंधेरी पोलिस ठाण्यातील हैराण करणारा प्रकार पुढे आला. वरिष्ठांच्या बदलीनंतर आनंद व्यक्त करत महिलेने थेट पोलिस ठाण्याच्या आवारात फटाके फोडत आनंद व्यक्त केल. या महिला पोलिस शिपायाचा पती आयपीएस अधिकारी असल्याचे कळतंय.

अंधेरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याचा कारनामा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. ही महिला पोलिस शिपाई कामास टाळाटाळ, काही काम सांगितल्यास धमक्या देत असे. हेच नाही तर या महिला पोलिस शिपाईचा पती थेट आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. या महिलेच्या तक्रारीनंतर थेट अंधेरी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची बदली करण्यात आली. या बदलीनंतर या महिला पोलिस शिपाईने संपूर्ण ठाण्यात आनंद व्यक्त करत पोलिस स्टेशन डोक्यावर घेतले. थेट पोलिस स्टेशन परिसरात फटाके फोडली. याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. वरिष्ठांच्या बदलीनंतर महिला पोलिस शिपाईने केलेला हा कारनामा पूर्ण पोलिस दलाकरिता चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची बदली मुंबई पोलिस विशेष शाखा 1 मध्ये बदली झाली. हैराण करणारे म्हणजे त्यांच्या प्रमोशनसाठी फक्त 6 महिने शिल्लक असताना त्यांची बदली करण्यात आली.
मुंबई पोलिस विशेष शाखा 1 मध्ये त्यांची बदली करण्यात आली. बदलीची माहिती मिळताच उत्साह साजरा करत या महिलेने पोलिस ठाण्याच्या परिसरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडून संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याला कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप तिने केला. महिलेच्या तक्रारीनंतर कोणतीही चाैकशी न करता उमेश मच्छिंद्र यांची बदली करण्यात आली.
त्यांची थेट उलचबांगडी केली, अशी चर्चा पोलिस दलात रंगत आहे. ही महिला कर्मचारी अंधेरी पोलिस स्टेशनमधील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही दमदाटी करत असल्याची माहिती आहे. महिला माझा पती आयपीएस अधिकारी असल्याचे कायम सांगत. मच्छिंद्र यांच्या बदलीकरिता आपल्या पतीच्या माध्यमातून महिलेने दबाव टाकल्याची चर्चा रंगत आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांनी पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी महिलेविरोधात तक्रार केल्यानंतर चार रिपोर्ट पाठवले. पण महिलेवर कारवाई न करता थेट तडकाफडकी उलट उमेश मच्छिंद्र यांचीच बदली करण्यात आली. 13 नोव्हेंबर रोजी उमेश मच्छिंद्र यांच्या बदलीचा निर्णय झाला. त्यानंतर अजय कुलकर्णी यांनी उमेश मच्छिंद्र यांचा कारभार स्वीकारला.