AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prabodhini Ekadashi 2026: प्रबोधिनी एकादशीचा उपवास नेमका कधी करायचा? 20 की 21 नोव्हेंबर? जाणून घ्या पंचांगकर्त्यांनी सांगितलेली माहिती

Prabodhini Ekadashi 2026: यंदा प्रबोधिनी एकादशीचा उपवास नेमका कधी करायचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी याविषयीची महत्त्वाची माहिती दिली आहे.

Prabodhini Ekadashi 2026: प्रबोधिनी एकादशीचा उपवास नेमका कधी करायचा? 20 की 21 नोव्हेंबर? जाणून घ्या पंचांगकर्त्यांनी सांगितलेली माहिती
प्रबोधिनी एकादशीचा उपवास नेमका कधी करायचा? Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2026 | 9:38 AM
Share

Prabodhini Ekadashi 2026: हिंदू धर्मात प्रबोधिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या एकादशीला देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं. मात्र, यंदा प्रबोधिनी एकादशीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षी कार्तिक शुक्ल एकादशी दोन दिवसांची असल्याने उपवास नेमका 20 नोव्हेंबरला करायचा की 21 नोव्हेंबरला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

यंदा दोन दिवस एकादशी का?

दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कार्तिक शुक्ल एकादशी ही क्षय तिथी आलेली आहे. क्षय तिथी म्हणजे एखाद्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जी तिथी अस्तित्वात नसते, त्या तिथीला क्षय तिथी म्हणतात. त्यामुळे यंदा पंचांग आणि दिनदर्शिकेत दोन वेगवेगळ्या एकादशींची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी, तर शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी भागवत एकादशी आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी उपवास करायचा, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, शैव आणि वैष्णव संप्रदायानुसार उपवासाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत.

शैव आणि वैष्णवांनी उपवास कधी करावा?

दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे शंकराचे भक्त आहेत, म्हणजेच शैव संप्रदायाचे अनुयायी आहेत, त्यांनी शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी स्मार्त एकादशीचा उपवास करावा. तर जे भगवान विष्णूचे भक्त आहेत, म्हणजेच वैष्णव संप्रदायाचे अनुयायी आहेत, त्यांनी शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी भागवत एकादशीचा उपवास करावा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायाचे अनुयायी आणि भगवान विष्णूचे भक्त यांनी शनिवारी उपवास करावा. त्यामुळे आपल्या संप्रदायानुसार आणि धार्मिक परंपरेनुसार भाविकांनी उपवासाचा दिवस निश्चित करावा.

तुळशी विवाहासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही

प्रबोधिनी एकादशीपासून तुळशी विवाहाच्या सोहळ्यालाही सुरुवात होते. यंदा शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी भागवत एकादशीपासून ते मंगळवार, 24 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करता येणार आहे. विशेष म्हणजे, तुळशी विवाहासाठी स्वतंत्र मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. तसंच राहुकाळ पाहण्याचीही गरज नाही, असं दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केलं आहे. शक्यतो प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या आसपासच्या काळात तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. त्यामुळे भाविकांना या चार दिवसांच्या कालावधीत आपल्या सोयीनुसार तुळशी विवाहाचा धार्मिक विधी करता येईल.

Follow Us
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो...
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो स्टेशनला मिळणार चैत्यभूमी नाव
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या बैठकीत ठरणार रणनीती!
एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी...
Gokul Milk : एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी महागलं?