शरद पवार यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देताच बड्या नेत्याचा राजीनामा, धाड.. धाड.. पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे..

Sharad Pawar NCP delimitation bil l: डिलिमिटेशन बिल उद्या संसदेत मांडले जाणार आहे. त्यापूर्वीच इंडिया आघाडीने मोठी बैठक दिल्लीत घेतली. मात्र, या बैठकीकडे शरद पवारांच्या पक्षाने पाठ फिरवली. त्यातच आता सुप्रिया सुळे आज रात्री खासदारांसोबत दिल्लीत दाखल होणार आहेत. दिल्लीत घडामोडींना वेग आला.

शरद पवार यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देताच बड्या नेत्याचा राजीनामा, धाड.. धाड.. पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे..
Sharad Pawar
| Updated on: Nov 29, 2026 | 10:51 AM

डिलिमिटेशन बिलावरून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शदर पवार या विधेयकाला पाठिंबा देणार आहेत. इंडिया आघाडीने काल दिल्लीत बैठक बोलावली होती. पण या बैठकीला शरद पवार यांच्या पक्षातील एकही खासदार उपस्थित नव्हता. इंडिया आघाडीविरोधात जाऊन शरद पवार यांचा पक्ष मतदान करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या दिल्लीत सुप्रिया सुळे आपल्या पक्षातील खासदारांची उद्या बैठक घेणार आहेत. इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचे बघायला मिळतंय. आज रात्री सुप्रिया सुळे पक्षातील सर्व खासदारांसोबत दिल्लीत दाखल होणार आहेत. मोदी सरकारकडून उद्या हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. शरद पवार यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा आरोप काँग्रेस पक्षकडून केला जात आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

डिलिमिटेशन बिलाला विरोध असून इंडिया आघाडीसोबत असल्याची दोघांमध्ये चर्चा झाली. शरद पवार पक्षाने घेतलेल्या निर्णयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार एनडीएत सहभागी होणार असल्याचे जवळपास स्पष्टच आहे. त्यातच आता शरद पवार यांच्याविरोधातील नाराजी वाढताना दिसत आहे. पदाधिकाऱ्यांकडून धाड.. धाड.. राजीनामे दिली जात आहेत. अभयसिंह जगताप यांनी राष्ट्रवादी युवक सरसिटणीसपदाचा राजीनामा दिला.

Loading...

राष्ट्रवादी माण खटाव विधानसभा अध्यक्ष व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी आपल्या पदासोबतच पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला. काँग्रेस आणि मविआचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत असतानाच पदाधिकारीही नाराज झालेत. डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने नाराजी वाढत आहे. शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकारी आपली नाराजी सोशल मीडियावर जाहीर करत आहेत.

लक्ष्मण मारोतराव ईक्कर पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्याची सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी माझ्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहिलो. अजित पवारांनी पक्ष फोडल्यानंतरही मी शरद पवार यांच्यासोबतच राहिलो. कोणताही राजकीय फायदा दृष्टीक्षेपात नव्हता, याचा मला अभिमान आहे.

त्याचे कारण म्हणजे शरद पवार हे महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना कधीच तिलांजली देणार नाही, असा विश्वास होता. पण आज धुळीत मिळाली. त्यांच्याबद्दल आदर राहिल. त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व निर्णयाचे समर्थन केले. पुरोगामी विचारांच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहन करणे शक्य नाही. शेवटी कसे ना विचार फार जास्त महत्वाचा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us