माजी कॅबिनेट मंत्र्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

मुंबई/रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला कोकणात मोठा धक्का बसलाय. रायगडमधील काँग्रेसचा बालेकिल्ला साभांळणारे माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे खंदे समर्थक रवी पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. काँग्रेस आघाडीच्या अनुषंगाने रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांना राजकीय कोंडीत पकडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना लोकसभेच्या अगोदर मोठा …

माजी कॅबिनेट मंत्र्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

मुंबई/रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला कोकणात मोठा धक्का बसलाय. रायगडमधील काँग्रेसचा बालेकिल्ला साभांळणारे माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे खंदे समर्थक रवी पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. काँग्रेस आघाडीच्या अनुषंगाने रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांना राजकीय कोंडीत पकडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना लोकसभेच्या अगोदर मोठा अपशकुन झाला आहे.

काँग्रेसचे निष्ठावंत आणि दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे कट्टरसमर्थक म्हणून ओळखले जाणारे पेणचे माजी आमदार आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह रात्री उशीरा वर्षा बगंल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित मोठ्या सख्येने उपस्थित होते.

रवी पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधक एकत्र येत असल्याने रायगडातही या महाआघाडीच्या राजकारणाने जोर पकडला आहे. प्रत्येक ठिकाणची राजकीय स्थिती वेगळी असल्याने रायगडात काँग्रेस-शेकापचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. येथे महाआघाडी कशी यशस्वी होणार हा प्रश्न होता. कारण, सुनील तटकरे यांनी अगोदरच रणनीती खेळत काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या पेण, अलिबाग, उरण येथे शेकापशी जुळवून घेत राष्ट्रवादी सोबत आघाडीत सामाविष्ट करून घेतलंय. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आणि वारंवार आघाडी असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात  तटकरे बंधूंकडून अपक्ष भूमिकेतून काँग्रेस उमेदवारांना अडचणीत आणण्याचे काम राष्ट्रवादीने केले. त्यामुळे अलिबाग आणि पेणचे काँग्रेस उमेदवार पराभूत होत असत. या विरोधात काँग्रेसचे वरिष्ठ राष्ट्रवादीच्या खेळींना बळी पडून काँग्रेसच्या उमेदावारांना बळच देत नसत, असाही आरोप आहे. याची वरिष्ठ पातळीवर तक्रार करुनही दुर्लक्ष करण्यात आलं होतं.

रवी पाटील गेल्या 25 वर्षांपासून दिवंगत नेते अंतुले यांच्या तालमीत पेण-सुधागड या शेकापचे दिवंगत माजी आमदार मोहन पाटील आणि विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांच्यासमोर एकाकी लढत दिली. त्यामुळे स्थानिक पातळीपर्यंत मजबूत संपर्क असणारा नेता गमावणं काँग्रेससाठी अडचणीचं ठरणार आहे. येत्या निवडणुकीत याचा काँग्रेसला फटका बसू शकतो. पेण, रोहा तालुक्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. रवी पाटील हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही निकटर्वीय म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी रवीशेठ पाटील यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती.

आता यापुढे आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जोडीला रवींद्र पाटील यांची साथ भेटल्याने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस कमकुवत आणि भाजपा मजबूत अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे भाजपा जिल्ह्यात प्रमुख पक्ष झाल्याने याचा फटका राष्ट्रवादीसह शेकापला बसल्याशिवाय राहणार नाही, असं जाणकांरांचं मत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *