Lodha: फसवणूक अन् जीवे मारण्याची धमकी, लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक आणि धमकीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Lodha: फसवणूक अन् जीवे मारण्याची धमकी, लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक
Rajekdra Lodha
| Updated on: Sep 17, 2025 | 6:35 PM

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक आणि धमकीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात राजेंद्र लोढा यांना आरोपी बनवण्यात आलेले आहे. राजेंद्र लोढा यांना मुंबईतील वरळी परिसरातून अटक करण्यात आली असून, आज कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजेंद्र लोढा यांच्यावर 85 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

राजेंद्र लोढा हे लोढा ग्रुपचे संचालक होते. आता ते संचालक पदावरून पायउतार झाले आहेत. राजेंद्र लोढा हे मंगलप्रभात लोढा यांचे दूरचे नातेवाईक असून लोढा ग्रुपचीच फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपची 85 कोटींची फसवणूक केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. अधिकार नसतानाही राजेंद्र लोढा यांनी अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण करून आणि लोढा ग्रुपमधील अनेक फ्लॅट परस्पर विकून जंगम मालमत्ता कमावल्याचे समोर आले आहे.

अभिषेक लोढा यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी

राजेंद्र लोढा यांनी मंगलप्रभात लोढा यांचे सुपुत्र अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आपल्यावर लोढा ग्रुपकडून कारवाई होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर राजंद्र लोढा यांनी आपल्या हस्तकाला अभिषेक लोढा यांच्याकडे पाठवले होते. या व्यक्तीने मी एक सुसाईड बॉम्बर असून राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई झाल्यास तुमचे बरे वाईट करणार असल्याची धमकी दिली होती. या सर्व प्रकरणात आता राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पदाचा गैरवापर केला

लोढा डेव्हलपर्स ही भारतातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने राजेंद्र लोढा यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘राजेंद्र लोढा यांना फक्त जमीन घेण्याचा अधिकार होतास मात्र त्यांनी कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेची अनधिकृत विक्री करून आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.