गडचिरोलीच्या सर्पदंश प्रकरणात पहिली मोठी कारवाई; मुख्याधापकासह अधीक्षकाला अटक, आणखी कोण गळाला लागणार?

गडचिरोलीच्या सर्पदंश प्रकरणात पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्याधापकासह अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या सर्पदंश प्रकरणात पहिली मोठी कारवाई; मुख्याधापकासह अधीक्षकाला अटक, आणखी कोण गळाला लागणार?
| Updated on: Aug 13, 2026 | 11:53 AM

गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी सर्पदंश प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. तीन निष्पाप विद्यार्थिनीच्या आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना अटक केली आहे. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील सामूहिक सर्पदंश घटने संदर्भात पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात जपतलाई येथील खाजगी अनुदानित आश्रम शाळेत सामूहिक सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तर काही विद्यार्थिनी जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात बुधवारी धानोरा पोलीस ठाण्यात मध्यरात्री पाच जणांवर विविध कलमाने गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्या संदर्भात शाळेतल्या कर्मचाऱ्यांचे विधान बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी घेतले. त्यानंतर गुरुवारी मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भोयर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तत्पूर्वी, आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणामुळे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर कारवाईने या प्रकरणात घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात धानोरा पोलीस स्टेशन येथे पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय. सध्या संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना धानोरा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शाळेची पाहणी केल्यानंतर या याप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे.

संस्थेचे दोन पदाधिकारी नॉट रिचेबल

सध्या संस्थेचे संचालक मारोतराव कोवासे, सचिव विश्वजीत कोवासे या दोघांचे मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. सध्या या प्रकरणात धानोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तपास करीत आहेत.या प्रकरणात धानोरा पोलिसांकडून आणखी आरोपी गळाला लागण्याची शकत्यता आहे. पोलिसांकडून आता संचालक मारोतराव, कोवासे यांचा शोध घेत आहेत. त्यांचे मोबाईल असल्याने नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी तपास वाढवला आहे. परंतु पोलिसांकडून लवकरच दोघांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us