भारतीय रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी 386 विशेष रेल्वे गाड्या धावणार, मुंबईत मेट्रोची सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार, जाणून घ्या काय काय बदल..
Ganesh Chaturthi 2026 : कोकण आणि गणपती हे एक अनोखं नातं आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातात. उत्सवकाळात रेल्वेसेवेत मोठे बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या काय काय बदल..

Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थी असल्यामुळे राज्यात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. कोकणात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला जातो. या सणाचा आनंद लुटण्यासाठी लाखो चाकरमानी कोकणात जात आहे. अनेक जण कोकणात पोहोचले आहेत, तर अनेक जण प्रवासात आहे. एवढंच नाही तर, गणेश चतुर्थीसाठी सरकारकडून देखील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आता गणेशोत्सवानिमित्त 386 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. कोकणासाठी सीएसएमटी – सावंतवाडी दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सांगायचं झालं तर, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाने यावर्षी एकूण 386 गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली. यामध्ये मध्य रेल्वेच्या 258, पश्चिम रेल्वेच्या 64, कोकण रेल्वेच्या 58 आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या 6 विशेष गाड्यांचा समावेश आहे.
याशिवाय मुंबई – कोकण मार्गावरील वाढती मागणी लक्षात घेऊन सीएसएमटी – सावंतवाडी रोडदरम्यान अनारक्षित विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेने 8 सप्टेंबरपासून मुंबई-सावंतवाडी रोडदरम्यान नवी दैनंदिन एक्स्प्रेस सुरू केली. त्यानंतर आता 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान सीएसएमटी – सावंतवाडी रोड या मार्गावर चार अतिरिक्त विशेष फेऱ्या धावणार आहेत. कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या आतापर्यंत 2.50 लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केलं आहे. तर, सुमारे एक लाख अनारक्षित प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची सेवा मध्यरात्रीपर्यंत
गणेशोत्सवात मुंबईत मेट्रोची सेवा मध्यरात्रापर्यंत सुरु राहणार आहे. 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. रोज रात्री 11 वाजता शेवटची मेट्रो सुटते, पण गशोत्सवाच्या काळात मेट्रो दीड तासांनी वाढण्यात येणार आहे. मेट्रो लाइन 2A, 7, 9 आणि 2Bची सेवा रात्री 12.30 वाजेपर्यंत सुरु राहील. मेट्रो लाईन दररोज 10 ते 15 अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
मेट्रोसेवेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. वर्सोवा-घाटकोपर शेवटची मेट्रो 12.15 वाजता सुटेल.घाटकोपरहून वर्सोवासाठी शेवटची मेट्रो 12.40 वाजता सुटेल.अॅक्वा लाइन 3 वरही मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा सुरु राहील. ज्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे.