Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… मुंबई, पुण्यात विसर्जनाची जय्यत तयारी, भाविकांची गर्दी..

Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पाचे आज विसर्जन केले जाईल. मिरवणुकांना काही वेळातच सुरूवात होईल. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली. बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत.

Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... मुंबई, पुण्यात विसर्जनाची जय्यत तयारी, भाविकांची गर्दी..
Ganpati Visarjan
| Updated on: Sep 25, 2026 | 7:29 AM

गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या गणपतींसाठी स्वतंत्र मार्ग, समुद्रात कृत्रिम ब्रिजसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बघायला मिळतोय. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र रांगा दोन तयार करण्यात आल्या आहेत.चार फुटांखालील गणपतींसाठी डाव्या बाजूला, तर मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतींसाठी उजव्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  पीओपीच्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित होऊ नयेत, यासाठी कृत्रिम तलावांचीही उभारणी करण्यात आली आहे.

मोठ्या गणपतींच्या विसर्जनावेळी भाविकांच्या सोयीसाठी समुद्रात पहिल्यांदाच कृत्रिम ब्रिज उभारण्यात आला आहे.  विशेषता या चौपाटी परिसरात पालिकेकडून स्वागतासाठी पंडाळ, पोलिसांच्या बोटी, विशेष गस्त, कंट्रोल रूम आणि अतिरिक्त बंदोबस्तासह विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 10 पर्यंत भाविकांची गर्दी वाढेल.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूक 9 वाजता सुरूवात होईल. बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची पुण्याचा राजा अशी ओळख आहे. गणेशाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी बघायला मिळतंय. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त भावनिक झाले.

अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पाचं निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक 9 वाजता सुरु होणार आहे. पालखीत बसून बाप्पाच्या मुख्य मिरवणूकीला 9 वाजता होणार सुरवात. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिस यांच्याकडुन करण्यात आली जोरदार तयारी.

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त भावनिक झाले. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीला देशभरात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध. गणेशाच्या विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडलेत. मोठी गर्दी लोकांची रस्त्यावर बघायला मिळतंय. मुंबई आणि पुण्यात मोठ्या मिरवणूका बघायला मिळतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us