CJP विरोधात जेन नेक्स्ट रस्त्यावर, अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला जोरदार विरोध, मुंबईत वातावरण तापलं

मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे मुंबईत सीजेपीच्या वतीने निवडणूक आयोगा विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आता अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरल्याची पहायला मिळत आहे.

CJP विरोधात जेन नेक्स्ट रस्त्यावर, अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला जोरदार विरोध, मुंबईत वातावरण तापलं
सीजेपीविरोधात मुंबईत आंदोलन
Image Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Oct 02, 2026 | 4:49 PM

मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे मुंबईत सीजेपीच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आता अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरल्याची पहायला मिळत आहे. देशभरात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरून विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सीजेपीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, 2029 मध्ये होणारी निवडणूक ही 2025 च्या मतदार यादी प्रमाणेच घ्यावी अशा देखील काही मागण्या सीजेपीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

आपल्या या विविध मागण्यांसाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सीजेपीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं जेन झी तरुण सहभागी झाले आहेत. मात्र दुसरीकडे आता अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. जेन नेक्स्टकडून मंत्रालय परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता एकाचवेळी दोन आंदोलन सुरू झाल्यामुळे मुंबईतील वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

Loading...

सीजीपी कॉकरोच जनता पार्टी राजकारण करत आहे. आम्ही संविधान माणनारे लोक आहोत. मात्र दिपके आणि त्यांची गँग संविधान मानत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांच्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असं यावेळी जेन नेक्स्ट आंदोलकांनी म्हटलं आहे.

दरम्यान आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहोत. जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचं आदोंलन सुरूच राहिलं, आम्ही देशाच्या विविध भागात आंदोलन करू, त्यानंतर दिल्लीमधील जतंर -मतंरवर आंदोलन करू असा इशारा मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांच्याकडून देण्यात आला आहे. आज मुंबईमध्ये सीजेपीच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या आंदोलनाला विरोध देखील होत  आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us