दाताचं ऑपरेशन करताना अतिरक्तस्राव, पिंपरीतील तरुणीचा मृत्यू

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचीमधील निगडी प्राधिकरण या उच्चभ्रू परिसरात असलेल्या नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. दाताचे दुखणे समोर आल्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाला आहे. धनश्री जाधव असे 23 वर्षीय मुलीचे नाव असून, याप्रकरणी धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणाची तक्रारी अर्ज दाखल केली आहे. …

teeth operation pimpri chinchwad, दाताचं ऑपरेशन करताना अतिरक्तस्राव, पिंपरीतील तरुणीचा मृत्यू

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचीमधील निगडी प्राधिकरण या उच्चभ्रू परिसरात असलेल्या नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. दाताचे दुखणे समोर आल्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाला आहे. धनश्री जाधव असे 23 वर्षीय मुलीचे नाव असून, याप्रकरणी धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणाची तक्रारी अर्ज दाखल केली आहे.

दीड वर्षांपासून धनश्रीच्या दातांमध्ये समस्या होती. ती निगडीच्या नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून धनश्रीवर ट्रीटमेंट सुरू होती. त्यानुसार धनश्री ही आठ दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली. उपचार सुरुही झाले. परंतु ज्यावेळी उपचार सुरू होते. त्यावेळेस धनश्रीचा अतिरक्तस्राव झाल्याने धनश्रीची प्रकृती ढासळली. याच घटनेकडे नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केले. त्यात धनश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ही घटना समजताच नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टर पाटील दाम्पत्य हे फरार झाले असून या प्रकरणी धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसांत तक्रार अर्ज केला आहे. त्यानुसार निगडी पोलीस तपास करत आहेत. अधिक तपास करून गुन्हा नोंद करण्यात येईल, असे निगडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. परंतु या मोठ्या रुग्णालयात अशा पद्धतीने घटना घडणार असतील तर विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *