अंगणात खेळणाऱ्या मुलावर डुक्कराचा हल्ला, सीसीटिव्ही पाहिल्यानंतर घरचे हादरले, डॉक्टर म्हणतात…

या जिल्ह्यात खेळणाऱ्या 10 वर्षीय मुलांवर डुक्कराचा प्राणघातक हल्ला, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

अंगणात खेळणाऱ्या मुलावर डुक्कराचा हल्ला, सीसीटिव्ही पाहिल्यानंतर घरचे हादरले, डॉक्टर म्हणतात...
Pig Attack
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 14, 2023 | 8:27 AM

शाहिद पठाण, गोंदिया : घराच्या अंगणात खेळणाऱ्या एका दहा वर्षाच्या मुलावरती डुक्कराने भयानक हल्ला (Pig Attack)केला आहे. त्यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीत कैद (CCTV Video) झाला आहे. त्याचबरोबर सीसीटिव्ही सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे डुक्करांना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी लोकांनी केली आहे. हल्ला इतका भयानक केला की, तो मुलगा जाग्यावर आडवा झाला, त्यानंतर त्या मुलाला डुक्कर जोरात तोंडाने मारत करीत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मुलाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी (Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आता डुक्करांवरती महापालिका कधी कारवाई याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

3 मुले आपल्या घरासमोर एकत्र खेळत होती, त्याचवेळी…

घरासमोर खेळणाऱ्या 10 वर्षीय मुलांवर डुक्कराने प्राणघातक हल्ला केला आहे. मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना गोंदिया शहरातील हेमू कॉलनी चौक परिसरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैमेरात कैद झाली आहे. 3 मुले आपल्या घरासमोर एकत्र खेळत होती, त्यावेळी एका मोठ्या डुक्कराने 10 वर्षांच्या मुलावर अचानक हल्ला केला. डुक्कराने मुलावर अनेक वेळा हल्ला केल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. लोकांनी हे सगळं पाहिल्यानंतर आरडाओरडा केला, त्याचबरोबर डुक्कराला पळवून लावले आहे. दरम्यान जखमी अवस्थेत मुलाला जिल्हा केटीएस रुग्णालयात नेण्यात आले आहे.

परिस्थिती बिकट झाल्याचे व्हिडीओतून दिसत असल्याची चर्चा

गोंदिया शहरातील डुक्कर, भटक्या जनावरांची वाढती संख्या व त्यांच्यापासून जीवित व मालमत्तेला होणारा धोका लक्षात घेऊन अनेकवेळा गोंदिया नगर परिषदेकडे तक्रारी करूनही लक्ष न दिल्याने आता परिस्थिती बिकट झाल्याचे व्हिडीओतून दिसत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. दरम्यान ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.