गोंदियात अग्निकांडाविरोधात मोर्चा; आरोपीच्या फाशीची मागणीसह यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर

| Updated on: Feb 23, 2023 | 9:30 AM

आरोपीने आरतीची प्लाऊज व पेटीकोटवर धींड सुद्धा काढली. तिचे केस गाडीला बांधून लोळले असल्याचे देखील यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभा देशमुख आणि सविता बेदरकर यांनी सांगितले.

गोंदियात अग्निकांडाविरोधात मोर्चा; आरोपीच्या फाशीची मागणीसह यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर
Follow us on

गोंदिया : गोंदिया शहरातील सूर्याटोला येथे किशोर शेंडे याने पत्नी, मुलगा व सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. यामध्ये सासरे देवानंद मेश्राम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी आरती किशोर शेंडे वय ३० वर्ष व मुलगा जय किशोर शेंडे वय ४ वर्ष यांचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील किशोर शेंडे याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने किशोरला ५ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपीला भंडारा येथील कारागृहात पाठविण्यात आले. आरोपीला फाशी व्हावी तसेच प्रकरण फास्टट्रॅकमध्ये चालवावे या करिता सूर्याटोला येथील शेकडो लोकांनी गोंदिया शहरात मोर्चा काढला. शहरातील मुख्य जयस्तंभ चौकात मृतकांना कँडल जाळून श्रद्धांजली अर्पण केली.

तीन जणांचा गेला बळी

स्थानिक आमदार यांना निवेदन देत मृतक कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. १५ फेब्रुवारीच्या रात्री सगळे झोपले असताना आरोपी तिरोडा येथून एका कॅनमध्ये पेट्रोल घेऊन आला. सासऱ्याला, पत्नी व मुलावर पेट्रोल टाकून जाळून आरोपीनी घटना स्थळावरून पळ काढला. याची माहिती परिसरातील लोकांना होताच परिसरातील लोकांनी धाव घेत जळालेल्या लोकांना गोंदिया येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र आरोपीचे सासरे यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा व पत्नी अधिक प्रमाणात जळाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी

मात्र उपचाराच्यादरम्यान दुसऱ्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाला. तर दोन दिवसांपूर्वी पत्नीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करत तसेच मृतकांना श्रद्धांजली व मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, याकरिता सूर्याटोला परिसरातील शेकडो लोकांनी गोंदिया शहरात मोर्चा काढला. शहरातील मुख्य चौक जयस्थंभ येथे मृतकांना श्रदांजली अर्पण करण्यात आली. स्थानिक आमदार यांना निवेदन दिले की, शासनाकडून मृतक कुटुंबीयांना मदत मिळावी असे निवेदन देण्यात आले. अशी माहिती स्थानिक यशराज बहेकार आणि मृतकाची पत्नी ममता मेश्राम यांनी दिली.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

पत्नीच्या चारित्र्यावर संशय करत आरोपी आरतीसोबत भांडण करीत असे. यामुळे आरती आपल्या मुलाला आणि मुलीला घेऊन दीड महिन्यांपूर्वीच माहेरी आली होती. माहेरची परिस्थिती बरोबर नसल्याने स्वतः आरती आपला उदनिर्वाह चालविण्यासाठी खाजगी रुग्णालयात काम करायची. मात्र आरोपी वारंवार तिला त्रास द्यायचा. माझ्या सोबत चल म्हणून त्रास देत असे. मात्र आरतीला आरोपी मात्र असल्याने आरतीने जाणे टाळले. तसेच सासरी येऊनसुद्धा भांडण करत असे. मात्र आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने ही कृती केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.

यापूर्वीचेही आरोपीचे कारनामे

पोलिसांकडून आरोपीचे प्रकरण फास्टट्रॅकमध्ये चालवण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी दिली. आरोपीच्या विरोधात याआधी सुद्धा तिरोडा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या आधी सुद्धा आरोपीने आरतीची प्लाऊज व पेटीकोटवर धींड सुद्धा काढली. तिचे केस गाडीला बांधून लोळले असल्याचे देखील यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभा देशमुख आणि सविता बेदरकर यांनी सांगितले.