शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट महिन्यातील पावसाचा मोठा अंदाज, मराठवाडा आणि विदर्भात..

Maharashtra August Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यामध्येच आता ऑगस्ट महिन्यातील पावसाबद्दल मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पुढे येतंय.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट महिन्यातील पावसाचा मोठा अंदाज, मराठवाडा आणि विदर्भात..
Maharashtra August Rain Update
| Updated on: Aug 01, 2026 | 9:18 AM

यंदा जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. जून महिन्यात सुरूवातीला पावसाने दांडी मारली. मात्र, त्यानंतर धुवाधार पाऊस राज्यात झाला. पेरण्या थोड्या पुढे ढकलल्या गेल्या पण दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवरील टळले. आता राज्यात जवळपास 85 टक्के पेरण्या झाल्या आहेत. शिवाय दमदार पाऊसही हजेरी लावत आहे. काही भागात आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सतत कोसळत आहे. आता ऑगस्ट महिन्यातील पावसाबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली. यंदा ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस होईल. हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल.

विदर्भात जुलै महिन्यात सरासरी 484.7 मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात 281.7 मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात 387.2 मिमी सरासरी पाऊस होत असतो. यावेळी त्यापेक्षाही जास्त चांगला पाऊस झाला. कोकणात जुलै महिन्यात 1767.5 मिमी पाऊस झाला. सुरूवातीला एल निनोचे संकट प्रशांत महासागरात आल्याने राज्यात पाऊस चांगला होणार नसल्याचा अंदाज जगभरातून वर्तवला जात होता.

मात्र, जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून दमदार पाऊस राज्यात होताना दिसला. त्यामध्येच आता ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात अधिक पाऊस ऑगस्टमध्ये होण्याचा अंदाज आहे. पावसाचा जोर राज्यात पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

नाशिक शहरात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यातील काही तालुक्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. मालेगाव, कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि बागलाण तालुक्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला. रेड अलर्टमुळे संबंधित तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. नाशिक शहर आणि परिसरात सकाळपासून पावसाची उघडीप सुरू आहे. पाऊस कमी झाला तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. सध्या गंगापूर धरणातून 3 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us