पडळकरांचा गनिमी कावा, एकदा नाही, दोनदा नाही, पडळकरांनी तीनदा करून दाखवलं, सरकार बघत राहिलं

| Updated on: Mar 27, 2022 | 5:35 PM

गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण पवारांच्या हस्ते करण्यास विरोध केला. आणि धनगर बांधवांच्या म्हणजे मेंढपाळांच्या हस्ते आम्ही आजच पुतळ्याचे उद्घाटन करणार असा घाट घातला.

पडळकरांचा गनिमी कावा, एकदा नाही, दोनदा नाही, पडळकरांनी तीनदा करून दाखवलं, सरकार बघत राहिलं
गोपीचंद पडळकरांनी दिलेलं आव्हान खरं करून दाखवलं
Follow us on

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) ही भाजपच्या ताफ्यातली राखीव तोफ आहे. जिथ कमी तिथं पडळकर मैदानात उतरतात. मग ते विद्यार्थ्यांचं आंदोनल असो, एसटीचे आंदोलन असो किवा कुठल्या पुतळ्याचा (Ahilyadevi Holkar) वाद असो, गोपीचंद पडळकर हे नाव रोज चर्चेत असतं. गोपीचंद पडळकर हे नेहमी पवार कुटुंबियांना (Sharad Pawar) टार्गेट करतात. आजही पुन्हा तेच दिसून आलं. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण पवारांच्या हस्ते करण्यास विरोध केला. आणि धनगर बांधवांच्या म्हणजे मेंढपाळांच्या हस्ते आम्ही आजच पुतळ्याचे उद्घाटन करणार असा घाट घातला. बघता बघता गोपीचंद पडळकर हजारो कार्यकर्त्यासह रस्त्यावर उतरले. काही वेळातच त्यांना सदाभाऊ खोत यांची साथ मिळाली. कारण पिवळा शर्ट पिवळी टोपी घातून सदाभाऊही खांद्याला खांदा लावत मैदानात उतरले. आणि या जोडगोळीने पुतळ्याचं उद्घाटन आजच करणार असा इशारा सरकारला दिला. आणि तो खराही करून दाखवला. आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गनिमी काव्याचा वापर करत सरकारला हतबल केलं आहे.

पहिल्यांदा जेजुरीतल्या पुतळ्याचं उद्घाटन

गेल्या वेळीही असाच अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला होता. जेजुरीतल्या पुतळ्याचे उद्घाटन पवारांच्या हस्ते नको, म्हणत पडळकर आक्रमक झाले. मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक केली. मात्र पडळकरांनी हार न मानता भल्या पाहटे लोक आणि पोलीस बेसावध असताना भल्या पाहटे या पुतळ्याचं लोकार्पण पवारांच्या आधी केलं. हे एकदाच घडलं नाही तर हे पडळकरांनी तीनवेळा करून दाखवलं आहे.

दुसऱ्यांदा शर्यतीत करून दाखवलं

बैलगाडा शर्यतीवरील बंदी अजून उठली नव्हती. त्यावेळी आम्हाला बैलगाडा शर्यत भरवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पडळकरांनी केली आणि शर्यतीचे आयोजन केले. मात्र सरकारने परवानगी नाकरली आणि बैलगाड्याचे ट्रॅकही खड्डे पाडून टाकले. मात्र तेव्हाही पडळकारांनी हार नाही मानली. पडळकरांनी ठरललेल्या दिवशीच पोलीस माळरानावर पाहरा देत असतानाही पाहटे दुसऱ्याच माळरानावर शर्यत संपन्न केली. एवढ्यावरही पडळकर थांबले नाहीते. आता पुन्हा पडळकरांनी तेच करून दाखवलं.

आज तिसऱ्यांदा करून दाखवलं

आजही सांगलीच्या पुतळ्याचा वाद पेटला. पवारांच्या हस्ते उद्घाटनाला पुन्हा पडळकरांनी विरोध केला. आणि उद्घाटन हे मेंढपालांच्या हस्ते होणारच अशी भूमिका घेतली. हजारो कार्यकर्त्यांसह सोबतील सदाभाऊ खोत यांना सोबत घेऊन सांगलीला पिवळी करून सोडली. बघेल तिकडं पिवळं वादळ दिसू लागले. आणि शेवटी पडळकरांनी सरकारला दिलेलं आव्हान खरं करत पुतळ्याचं लोकार्पण करून दाखवलं. आणि सरकरा पुन्हा फक्त हतबल होत बघत राहिलं.

Nana Patekar : नाना पाटेकर अटारी बॉर्डरवर, जवानांशी साधला संवाद, म्हणाले “तरूणांसाठी चांगली संधी…”

Star Pravah Parivar Puraskar 2022: सोहळ्यात सासू- सुनांचा दिसणार अनोखा अंदाज

Zee Maha Gaurav Puraskar 2022: झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात मनोरंजनाचा धमाका