खुबगावच्या जवानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार; गावावर शोककळा

| Updated on: Jun 02, 2022 | 7:26 AM

मृत शशिकांत राऊत हे 20 डिसेंबर 2011 ला बीएसएफमध्ये दाखल झाले. त्यांच्या परिवारात आई-वडील, पत्नी, अडीच वर्षाचा मुलगा, मोठा भाऊ, वहिनी व बहीण असा आप्त परिवार आहे.

खुबगावच्या जवानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार; गावावर शोककळा
जवान शशिकांत रमेश राऊत
Image Credit source: tv9
Follow us on

वर्धा : आर्वी तालुक्यातील खुबगाव (Khubgaon) येथील शशिकांत रमेश राऊत हे गुजरात गांधीनगर येथील बीएसएफमध्ये कार्यरत होते. मंगळवारी त्यांचा आकस्मिक मृत्यू (Accidental Death) झाल्याने त्यांचे पार्थिव अहमदाबादवरुन विमानाने नागपूरला आणण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता बीएसएफच्या वाहनाने पार्थिव गावात आणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. बीएसएफच्या पथकाने शशिकांत राऊत यांचे पार्थिवर गावात आणले. गावातून मिलिटरीच्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यात गावातील पुरुषांसह महिलांची मोठी उपस्थिती होती. गावक-यांनी घरा समोर रांगोळीच्या माध्यमातून ‘अमर रहे, वंदे मातरम्’ च्या घोषणा लिहिल्या होत्या.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

स्थानिक मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असून चुलत भावाने मुख्याग्नी दिला. बीएसएफच्या पथकाने मानवंदना देऊन राष्ट्रध्वज कुटुंबियांच्या स्वाधिन केला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्यासह महसूल व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिट मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.

परिवाराची भेटही अपूर्णच

मृत शशिकांत राऊत हे 20 डिसेंबर 2011 ला बीएसएफमध्ये दाखल झाले. त्यांच्या परिवारात आई-वडील, पत्नी, अडीच वर्षाचा मुलगा, मोठा भाऊ, वहिनी व बहीण असा आप्त परिवार आहे. साडे तीन-चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून दोन-तीन महिन्यापूर्वी मुलाच्या वाढदिवसाकरिता ते गावात आले होते.

हे सुद्धा वाचा

त्यांच्या परिवाराकडे दहा एकर शेती असून वडील शेती करतात तर मोठ्या भावाचे आर्वीत दुकान आहे. येत्या 24 जूनला सर्व परिवार शशिकांत यांच्याकडे गांधीनगराला जाणार होता. त्याकरिता रेल्वेचे तिकिटही काढलं होतं. परंतु या घटनेने परिवाराची भेटही अपूर्णच राहिली.

आत्महत्या नसून घातपात

दरम्यान जवान शशिकांत राऊत यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. परंतु ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. सहा फुट उंचीचा भारदस्त सैनिक कोणतेही कारण नसताना आत्महत्या का करेल? तीही शालीने गळफास घेवून! त्याच्या हाताची एकमुठ उघडी होती. हा आत्महत्येचा बनाव असून याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केली आहे.