AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Auction : आयपीएल मिनी लिलावात या खेळाडूंनी खाल्ला सर्वाधिक भाव, जाणून घ्या

आयपीएल मिनी लिलावात विदेशी खेळाडू मोठा भाव खाऊन हे आधीच माहिती होतं. झालंही तसंच.. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन आणि श्रीलंकेच्या मथिशा पथिराना यांनी सर्वाधिक भाव खाल्ला. चला जाणून घेऊयात महागड्या खेळाडूंबाबत..

IPL 2026 Auction : आयपीएल मिनी लिलावात या खेळाडूंनी खाल्ला सर्वाधिक भाव, जाणून घ्या
आयपीएल मिनी लिलावात या खेळाडूंनी खाल्ला सर्वाधिक भाव, जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Dec 16, 2025 | 4:48 PM
Share

आयपीएल 2026 मिनी लिलावात सर्वाधिक भाव कोण खाऊन जाणार याची उत्सुकता होती. विदेशी खेळाडूंना सर्वाधिक भाव मिळणार त्याप्रमाणेच घडलं. त्यासाठी बीसीसीआयने 18 कोटींचा चाप लावला होता. कारण मिनी लिलावात विदेशी खेळाडू सर्वाधिक भाव खाऊन जातात. हे आतापर्यंत निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे बीसीसीआयचा हा नियम देशांतर्गत क्रिकेटच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरला. कारण 18 कोटींच्या वरची रक्कम ही प्लेयर्स वेल्फेयर फंडमध्ये जाणार आहे. मिनी लिलावात विकत घेतलेल्या खेळाडूंपेक्षा न विकलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. यात पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांचंही नाव आहे. तर काही खेळाडूंनी सर्वाधिक भाव खाल्ला. यात वेंकटेश अय्यर आणि रवि बिष्णोई यांना भाव मिळाला. काय ते जाणून घ्या.

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात फलंदाजांची नावं पुकारली गेली. यात कॅमरून ग्रीनचं नाव पुकारलं गेलं. खरं तर हा अष्टपैलू खेळाडू आहे. पण त्याचं नाव पहिल्या टप्प्यात होतं. त्याच्यासाठी केकेआरने 25.20 कोटी मोजले आणि संघात घेतलं. ही मिनी लिलावातील सर्वात मोठी बोली होती. पण कॅमरून ग्रीनच्या खात्यात फक्त 18 कोटी मिळणार आहेत.

आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच श्रीलंकेच्या खेळाडूने सर्वाधिक भाव खाल्ला आहे. वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानासाठी केकेआरने 18 कोटींची बोली लावली. केकेआरची ही दुसरी मोठी बोली होती. बऱ्याच खेळाडूंना रिलीज केल्यानंतर केकेआरच्या पर्समध्ये चांगले पैसे होते. त्यामुळे त्यांनी दोन खेळाडूंवर पैसे मोजले. फिरकीपटू रवि बिष्णोईसाठी राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक बोली लावली. त्याच्या बेस प्राईसवरून बोली सुरू झाली. रवि विष्णोईसाठी राजस्थान रॉयल्सने 7.20 कोटी रुपये मोजले आणि संघात घेतलं. आता रवींद्र जडेजासोबत फिरकीचा एक पार्टनर मिळणार आहे.

वेंकटेश अय्यरसाठीही मोठी बोली लागणार याचा अंदाज होता. त्याच्या बेस प्राईस ही 2 कोटी होती. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याच्यासाठी 7 कोटी मोजले आणि संघात घेतलं. मेगा लिलावात केकेआरने त्याच्यासाठी मोठी बोली लावली होती. मागच्या पर्वात त्याला केकेआरने 23.75 कोटी मोजले होते. पण यावेळी त्याला 7 कोटी मिळाले आहेत. 16.75 कोटींचं वेंकटेश अय्यरला नुकसान झालं आहे.

जम्मू काश्मीरचा अनकॅप्ड प्लेयर्स आकिब दारने सर्वाधिक भाव खाल्ला. अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता पाहता त्याला हा मबाव मिळाला. त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने 8.40 कोटी रुपये मोजले.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ