जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, थेट 4 मोठे आदेश..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. सरकारकडूनही या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. सरकारने चार जीआर काढली आहेत.

जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, थेट 4 मोठे आदेश..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 07, 2026 | 1:50 PM

कुणबी नोंदी गावपातळीवर लावण्याबाबत विखे पाटलांची व्हीसीद्वारे आढावा बैठक झाली. हैदराबाद गॅझेटिअरनुसार मिळालेल्या नोंदी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्याच्या वेबसाईटवर नोंदी; ग्रामपंचायत स्तरावरही नोंदी प्रसिद्ध करण्याचे निर्देश. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. मिळालेली अधिकची माहिती अशी की, कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय. शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदी ग्रामपंचायत कार्यालयात 7, 8 आणि 9 सप्टेंबरला लावण्यात येणार. त्याचसोबत, सर्व डेटा वेबसाईटवर आजच प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती. प्रमाणपत्रासंदर्भात 10 सप्टेंबरपासून कॅम्प सुरु केले जाणार.

मराठा-कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअरनुसार उपलब्ध झालेल्या नोंदी गावपातळीवर लावण्याबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची आढावा बैठक झाली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे अधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत ही बैठक व्हीसीद्वारे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या कुणबी नोंदी जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात आल्या असून, नागरिकांना त्या मोबाईलवरही पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. तसेच ज्या गावांच्या नोंदी उपलब्ध झाल्या आहेत, त्या संबंधित ग्रामपंचायतीच्या स्तरावर प्रसिद्ध करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, गावपातळीवर उपलब्ध असलेल्या सर्व नोंदी नागरिकांना सहज पाहता याव्यात, यासाठी त्या ग्रामपंचायत स्तरावर लावण्याच्या सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध नोंदी प्रसिद्ध करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. सरकारने महत्वाचे आदेश काढली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us