गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर कला केंद्राबाबत धक्कादायक खुलासा, गंभीर आरोप, नर्तकी पूजा गायकवाड..

माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. नर्तकी सध्या पोलिस कोठडीत आहे.

गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर कला केंद्राबाबत धक्कादायक खुलासा, गंभीर आरोप, नर्तकी पूजा गायकवाड..
Govind Barge case
Updated on: Sep 16, 2025 | 9:42 AM

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे गोविंद यांनी चक्क कला केंद्रातील नर्तकीच्या घराबाहेर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांनी सोन्याचे दागिने, प्लॉट, सोन्याचे अनेक नाणी, बुलेट, आयफोन, डिझाईनर साड्या, शेतजमीन आणि घर बांधून कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडला दिले. मात्र, पूजा गोविंद बर्गेचा गेवराईतील बंगला हवा होता. त्यावरून ती दबाब टाकत होती आणि त्यानंतर गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर धाराशिव आणि सोलापूर जिल्हातील कला केंद्र तूफान चर्चेत आली आहेत.

आता माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर धाराशिवमध्ये लोकनाट्य कला केंद्राच्याविरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. लोकनाट्य कला केंद्र बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रशासनाला त्यांनी इशारा दिलाय. धाराशिव जिल्ह्यात डीजेच्या तालावर छम छम सुरु असून नियम धाब्यावर बसवत हे लोकनाट्य कला केंद्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

पारंपारिक नृत्य सोडून डीजे आणि सिनेमातील गाणी वाजवली जातात. वेशभूषा आणि वेळेचे पाळले केले जात नाही. चौफुला, जामखेडनंतर धाराशिव बनू पाहतय लोकनाट्य कला केंद्राचं हब, महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा कला केंद्र बंद करण्याचा प्रशासनाला इशारा दिलाय. सोलापूर धुळे महामार्गावरती पारगाव ते धाराशिव या परिसरामध्ये जवळपास 6 लोकनाट्य कला केंद्र सुरू असून आणखी नव्याने पाच कला केंद्राची उभारणी केली जात आहे.

कला केंद्राच्या अवतीभोवती गोळीबार, गँगवार आणि गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचा आरोप आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कला केंद्रावरील भांडणाचे गुन्हे दाखल आहेत. डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलेले माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तकी पूजा गायकवाड ही धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रात काम करत होती.

वेळेचे बंधन न पाळता रात्रभर ही कला केंद्रे सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ज्योती सपाटे यांनी केलाय. हेच नाही तर या कला केंद्रांकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याने ही कला केंद्र रात्रभर सुरू असल्याचा दावा काही नागरिकांनी केलाय. गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर कला केंद्र चांगलीच चर्चेत आली आहेत.