Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, ‘भारत माता की जय’ सदावर्तेंची घोषणा

| Updated on: Apr 14, 2022 | 6:17 PM

सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. सातारा पोलीस सदावर्ते यांना घेऊन आज साताऱ्यात दाखल झाले. सातारा पोलीस ठाणे आवारात पोहोचल्यानंतर सदावर्ते यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, भारत माता की जय सदावर्तेंची घोषणा
वकील गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात
Image Credit source: TV9
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यानंतर राज्यातील राजकारण अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता सदावर्ते यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. त्यानंतर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे (Satara Police) देण्यात आलाय. सातारा पोलीस सदावर्ते यांना घेऊन आज साताऱ्यात दाखल झाले. सातारा पोलीस ठाणे आवारात पोहोचल्यानंतर सदावर्ते यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं.

सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे का?

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर बोलताना सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांचा एकेरी उल्लेख करत बेताल वक्तव्य केलं होतं. पाटण तालुक्यातील कोंजवडेतील राजेश निकम यांनी त्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला होता. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय.

मराठा क्रांती मोर्चाकडून सदावर्तेंचा निषेध

गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यातर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे परिसरात घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा त्यांनी दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

बुधवारी कोर्टात काय झालं?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंची 7 दिवसांची कोठडी मागितली होती. तर पोलीस कोठडीची आता काहीही गरज नसल्याचा युक्तीवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला. गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्यावरही आता आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे, असे म्हणत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाचे लक्ष वेधले. खासकरून एसटी कर्मचाऱ्यांकडून दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली गेली, असा आरोप करण्यात आलाय. तसेच ही रक्कम गोळा करण्यात जयश्री पाटील यांचा मोठा सहभाग असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाला संगितले आहे.

इतर बातम्या :

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Fadnavis Tweet On Pawar : हिंदू दहशतवाद, बाबासाहेब ते इशरत जहाँ, पवारांच्याविरोधात फडणवीसचे सलग 14 ट्विट, वाचा सविस्तर