शरद पवारांची भेट घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुखांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, बोगस मतदान…सगळं सांगून टाकलं

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुखांचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी निवडणूक प्रकियेवरून गंभीर आरोप केला आहे.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुखांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, बोगस मतदान...सगळं सांगून टाकलं
harshada deshmukh
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 1:58 PM

पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवाराला पराभवाला सामोरे जावं लागलं. पुण्यातील दोन्ही मतदारसंघात महायुतीत उमेदवारीवरून हेवेदावे करण्यात आले होते. परंतु शेवटच्या क्षणी भाजपने दोन्ही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. तर शिंदे गटाने शिक्षक मतदारसंघात उमेदवार दिला. दोनपैकी पदवीधरमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावं लागले. पदवीधरमध्ये शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांनी बाजी मारली. कालच्या निकालानंतर हर्षदा देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर हर्षदा देशमुख यांनी शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर हर्षदा देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. हर्षदा देशमुख म्हणाल्या, ‘शरद पवारांचं सातत्याने मार्गदर्शन होतं. पाचपैकी तीन जागा कशा जिंकता येतात, हे शरद पवारांनी करून दाखवलं. शरद पवारांनी एका जागेवर बसून 5 पैकी 3 जिंकून आणल्या’. महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या. त्यावर हर्षदा देशमुख म्हणाल्या, ‘ जनतेमध्ये प्रचंड जनआक्रोश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात फिरताना लक्षात आलं. तो जनआक्रोश मताच्या रुपाने पाहायला मिळाला. शिक्षकांमध्येही मोठा रोष आहे. नोंदणीकडे पाहायला पाहिजे. शिक्षक मतदारसंघात बोगस मतदान देखील झालं होतं’.

Loading...

‘या निकालाने महाविकास आघाडीला नक्कीच उभारी मिळत आहे. सध्या जेन-झी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहिलं. शिक्षणाचे मोठे विषय आहेत. शिक्षण क्षेत्रातही पवारसाहेबांनी मोठं काम केलं आहे’. भाजप-शिंदे गटाच्या संघर्षावर हर्षदा देशमुख म्हणाल्या, महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करत आहे. तसाच विचार महायुतीने केला पाहिजे. खरंतर ते दिसून आलं. या निवडणुकीत महायुतीचे बरेच नेते नाराज होते. त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी नाराज होती’. रविंद्र धंगेकर यांच्या भूमिकेवर हर्षदा देशमुख म्हणाल्या, ‘ रविंद्र धंगेकर यांची एकदा तब्येत खराब झाली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा आमच्या लोकांनी त्यांना कॉल केला होता.  त्यामुळे मी नक्कीच त्यांना तब्येत विचारण्यासाठी फोन करेल’. पुढे म्हणाल्या, ‘निवडणुकीचं केंद्रस्थानी नेते नव्हते, तर पदवीधर आणि मतदार होते. यातील निवडणूक जनतेला हातात घेतली’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us