Terrorist Arrested | हरियाणात पकडलेल्या चार दहशतवाद्यांचं Nanded कनेक्शन? शस्त्रास्त्र साठा पुरवल्याचं उघड, आणखी काय काय हाती लागणार?

| Updated on: May 05, 2022 | 4:03 PM

हे चौघेही पंजाबचे राहणारे असून यापैकी तिघे फिरोजपूर आणि एक लुधियाना येथील रहिवासी आहे. हे चारही दहशतवादी बब्बर खालसा संघटनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

Terrorist Arrested | हरियाणात पकडलेल्या चार दहशतवाद्यांचं Nanded कनेक्शन? शस्त्रास्त्र साठा पुरवल्याचं उघड, आणखी काय काय हाती लागणार?
हरियाणात पकडलेले चार दहशतवादी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक बातमी उघड झाली आहे. हरियाणा पोलिसांनी (Hariyana Police) आजच चार दहशतवाद्यांना (Terrorist) पकडलं असून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हे दहशतवादी पंजाब, दिल्ली मार्गे महाराष्ट्रात नांदेडमध्ये (Maharashtra Nanded) हा शस्त्रसाठा आणणार होते. तेथून महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा त्यांचा हेतू होता, असा प्राथमिक अंदाज हरियाणा पोलिसांनी वर्तवला आहे. पंजाबमधील बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित हे अतिरेकी आहेत. गेल्या काही दिवासांपासून नांदेडमध्ये वाढलेल्या खून, गोळीबार आणि शस्त्र सापडण्याच्या घटनांमुळे नांदेडमधील नागरिकांमध्ये आधीच दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आता हरियाणा पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन उघड झालं आहे. त्यामुळे नांदेडमधील पोलीस यंत्रणा आणि सामान्य नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. हरियाणा पोलिसांच्या या कारवाईमुळे नांदेडवरील एक मोठं संकट टळल्याचं समोर येत असलं तरीही या अतिरेक्यांच्या चौकशीतून आणखी काय काय उघड होऊ शकते, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या दहशतवाद्यांकडून विस्फोटकं, इतर हत्यारं, बंदुका आणि काही जिवंत गोळ्या असे साहित्य जप्त केले आहे.

पकडलेल्या अतिरेक्यांची नावं काय?

हरियाणा येथील करनाल पोलिसांनी पकडलेल्या अतिरेक्यांची नावं अशी-
– गुरप्रित
– अमनदीप
– परमिंदर
– भुमिंदर
हे चौघेही पंजाबचे राहणारे असून यापैकी तिघे फिरोजपूर आणि एक लुधियाना येथील रहिवासी आहे. हे चारही दहशतवादी बब्बर खालसा संघटनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या दहशतवाद्यांकडून पिस्तूलाचे 31 काडतूस, 3 आयडी जप्त करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांकडे सापडलेला शस्त्रसाठा

गुंड रिंदाशी काय कनेक्शन?

पंजाब आणि नांदेड या दोन्ही ठिकाणी गुंड रिंदाची मोठी दहशत आहे. हरविंदरसिंग ऊर्फ रिंदा संधू हा बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. तो सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याने ड्रोनच्या माध्यमातून हे साहित्य फिरोजपूर येथे पाठवले. त्यानंतर हे चार दहशतवादी हे साहित्य घेऊन नांदेडला येणार होते. येथे महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा त्यांचा हेतू असावा, अशी माहिती करनाल पोलिसांनी दिली आहे. हरविंदरसिंग ऊर्फ रिंदा संधू हा सध्या पाकिस्तानच्या आयएएसच्या संरक्षणात पाकिस्तानमध्ये राहत आहे. नांदेडमध्ये हा शस्त्रसाठा पोहोचवण्याच्या बदल्यात या चौघांना मोठी रक्कम मिळणार होती. यापूर्वीही आरोपींनी नांदेडमध्ये असा शस्त्रसाठा पुरवला आहे. रिंदा यांना ड्रोनद्वारे पुरवठा करत होता. मोबाइल अॅपद्वारे त्यांना लोकेशन पाठवत असे. त्यानंतर हे दहशथवादी स्फोटकं घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवत होते, अशी त्यांची कामाची पद्धत असल्याचं पोलिस चौकशीत समोर आलं आहे.