AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिरायला जाणाऱ्यांनो सावधान! राज्याच्या या भागात अतिवृष्टीचा इशारा, अनेक पर्यटनस्थळे बंद

Tourist Places Closed : भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अनेक पर्यटकस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

फिरायला जाणाऱ्यांनो सावधान! राज्याच्या या भागात अतिवृष्टीचा इशारा, अनेक पर्यटनस्थळे बंद
Tourist Places CloseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 08, 2026 | 9:07 PM
Share

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक भागाला उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यानुसार अनेक पर्यटनस्थळे आता बंद राहणार आहेत.

साताऱ्यातील अनेक पर्यटनस्थळे बंद

डॉ. योगेश खरमाटे यांच्या आदेशानंतर आता धोम धरण, मेणवली घाट, लिंगमळा धबधबा, प्रतापगड यांसह वाई, खंडाळा व महाबळेश्वरमधील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे, धरणे, नदीपात्रे आणि धबधब्यांच्या ठिकाणी 6 जुलै ते 10 जुलै 2026 या कालावधीत पर्यटकांना व नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे बंद

पुणे जिल्ह्यातही गेल्या काही काळापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, कांचन धबधबा (हातवीज), रिव्हर्स वॉटरफॉल (नाणेघाट), किल्ले शिवनेरी, चावंड, जिवधन, हडसर, निमगिरी, आहुपे, डिंभे धरण, पोखरी घाट यासह आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि कोंढवळ धबधबा या ठिकाणी जाताना पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

पर्यटकांच्या खालील कृत्यांवर बंदी

अर्चना तांबे यांच्या आदेशानुसार आता वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे, धबधब्याखाली जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा चित्रीकरण करणे, मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे, बेदरकार वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, महिलांची छेडछाड करणे, मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक, डीजे किंवा वाहनांवरील स्पीकर वाजवणे अशा कृतींवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच बरोबर धबधबे, धरणे आणि नदी परिसरातील सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ