जिल्हाधिकाऱ्याने शिवसेना नेत्याच्या खासगी संस्थेला रेमडेसिवीर विक्रीला दिले; हिना गावित यांचा आरोप

| Updated on: Apr 28, 2021 | 3:54 PM

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला असतानाच भाजपच्या खासदार हिना गावित यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. (heena gavit allegations district collector over remdesivir)

जिल्हाधिकाऱ्याने शिवसेना नेत्याच्या खासगी संस्थेला रेमडेसिवीर विक्रीला दिले; हिना गावित यांचा आरोप
heena gavit
Follow us on

नंदूरबार: राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला असतानाच भाजपच्या खासदार हिना गावित यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत मिळाली होती. परंतु, नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला हे सर्व इंजेक्शन्स विक्रीसाठी दिली, असा आरोप खासदार हिना गावित यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (heena gavit allegations district collector over remdesivir)

खासदार हिना गावित यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक आरोप केला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नंदूरबारच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेसाठी 1 हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली होती. रोटरी वेलनेस सेंटर ही संस्था शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्र मिळाल्याच्या दिवशीच 6 एप्रिल रोजीच रोटरी वेलनेस सेंटर अँड मेडिसीन यांना शासकीय दरात 1 हजार रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यावेत असा लेखी आदेश नंदूरबारच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला. विशेष म्हणजे अशी इंजेक्शन मिळण्यासाठी रोटरी वेलनेसकडून नंदूरबारच्या जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना 5 लाख 94 हजार 500 रुपयांचा चेक 6 एप्रिल रोजीच मिळाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे, असं गावित म्हणाल्या.

प्रकरणाची चौकशी करा

सीएसआर फंडातून नंदूरबारच्या गरीब रुग्णांना उपचारासाठी मोफत मिळालेल्या 4,000 रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी एक हजार इंजेक्शन जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका खासगी संस्थेला विक्रीसाठी देणे नियमबाह्य आहे. या इंजेक्शनची विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट असताना जिल्हाधिकाऱ्यांनी 5 लाख 94 हजारांचा धनादेश स्वीकारून संस्थेला विक्रीसाठी दिली, हे सुद्धा चुकीचे आहे. शिवसेनेच्या नेत्याशी संबंधित खासगी संस्थेला लाभ पोहोचविण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. नगराध्यक्षांचे विनंती पत्र आले, त्याच दिवशी संबंधित संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाकडे धनादेश जमा झाला व आणि त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिवीर देण्याचा आदेश दिला ही तत्परताही संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

रुग्णांची नोंद होत नाही

नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्णांची नोंद होत नाही. ज्यांची नोंद होते अशा रुग्णांनी रुग्णालये भरलेली आहेत. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिविर देणे धक्कादायक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (heena gavit allegations district collector over remdesivir)

 

संबंधित बातम्या:

Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान

VIDEO: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरात कोणती झाडं लावावी?

(heena gavit allegations district collector over remdesivir)