बापरे! कल्याणमध्ये एकामागे एक तीन ठिकाणी मोठे होर्डिंग्ज कोसळले, राजू पाटील अधिकाऱ्यांवर बरसले

| Updated on: May 17, 2021 | 6:41 PM

कल्याणमध्ये अवघ्या काही तासांमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत (Hoardings collapsed on road in Kalyan)

बापरे! कल्याणमध्ये एकामागे एक तीन ठिकाणी मोठे होर्डिंग्ज कोसळले, राजू पाटील अधिकाऱ्यांवर बरसले
कल्याणमध्ये एकामागे एक तीन ठिकाणी मोठे होर्डिंग्ज कोसळले
Follow us on

कल्याण (ठाणे) : तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड वादळी वारे सुरु आहेत. या वाऱ्यांमुळे कल्याणमध्ये अवघ्या काही तासांमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना ही दुपारच्या सुमारास समोर आली. कल्याणच्या शीळ रोडवर एका पिकअपवर मोठं होर्डिंग कोसळलं. तर दुसरी घटना कल्याणचा मेट्रो मॉल समोर तर तिसरा पलावा मॉलसमोर रस्त्यावर मोठं होर्डिंग कोसळलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत (Hoardings collapsed on road in Kalyan).

पहिली दुर्घटना शीळ रस्त्यावर

कल्याणच्या शीळ रोडवर आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण दुर्घटना प्रचंड जीवघेणी होती. कल्याणच्या शीळ रोडवर एक भलमोठं होर्डिंग चालत्या पिकअपवर कोसळलं. गाडीतील चाकल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या जोडीदाराचं नशीब बलवत्तर असल्याने त्यांचा प्राण वाचला. पण ते गंभीर जखमी झाले. गाडीचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढलं.

दुसरी मेट्रो मॉलसमोर तर तिसरी पलावा मॉलसमोर

ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना कल्याणच्या मेट्रो मॉल बाहेररील रोडवर घडली. भलंमोठं होर्डिंग एका चालत्या बसच्या समोर पडलं. यावेळी बसचालकाने अर्जंट ब्रेक दाबला. त्यामुळे बसमधील सहा ते सात प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जात असल्याची माहिती मिळाली आहे. तर तिसरी घटना पलावा मॉलबाहेर घडली.

मनसे आमदार राजू पाटील हळहळले

या घटनांवर मनसे आमदार राजू पाटील हे देखील हळहळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी केडीएमसी महापालिकेच्या कामकाजांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी गेल्यावर्षीच महापालिकेला होर्डिंग्जचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याची विनंती केली होती. केडीएमसी, टीएमसी आणि एमएसआरडीसी यांना यांना वारंवार तक्रार करुनही अधिकारी लक्ष देत नाहीत. जाहिरात कंपनींसोबतच या अधिकाऱ्यांचे साटेलोटं आहे. त्यामुळे ते कारवाई करत नाहीत, असा घणाघात राजू पाटील यांनी केला.

राजू पाटील यांनी याबाबत पुरावाही सादर केला आहे. त्यांनी गेल्यावर्षी 12 जून 2020 रोजी केडीएमसीचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पत्राद्वारे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही पाहिजे तशी कारवाई झाली नाही.

हेही वाचा : काळ आला होता, पण वेळ नाही, भलंमोठं होर्डिंग थेट पिकअपवर कोसळलं, पुढचा भाग उद्ध्वस्त, दोन जण जखमी