Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी २ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्याविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने परांड्यातील तीन वेगवेगळ्या गोदामांवर एकाच वेळी छापेमारी केली. या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे १ कोटी २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान संबंधित गोदामांमधून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला असून, त्याची वाहतूक आणि साठवणूक कोणाच्या माध्यमातून केली जात होती याचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे परांडा परिसरातील अवैध गुटखा व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Published on: Jun 06, 2026 06:35 PM
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?