AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांना हा चित्रपट जास्त झोंबलाय, ‘देऊळ बंद 2’च्या टीकेवर प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर; कमाई 100 कोटींपासून किती दूर?

'देऊळ बंद 2' हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचताना दुसरीकडे या चित्रपटावर काहीजण टीकासुद्धा करत आहेत. या टीकाकारांना आता प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते काय म्हणाले, वाचा..

| Updated on: Jun 07, 2026 | 10:45 AM
Share
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट 21 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे. यामध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

1 / 5
बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी 1117 शोजमधून 2.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 66.56 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रविवारीही चांगली कमाई झाली तर हा चित्रपट 70 कोटी रुपयांचा टप्पा पार करू शकेल. तर भारतातील नेट कमाई 56.60 कोटी रुपये इतकी आहे.

2 / 5
'देऊळ बंद 2' या चित्रपटाने फक्त दोन आठवड्यांत 60.50 कोटी रुपये कमावले आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर इतर बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांची टक्कर असतानाही 'देऊळ बंद 2'साठी वीकेंडला थिएटर्समध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू का होईना, हा चित्रपट कमाईच्या 100 कोटींच्या टप्प्याकडे पोहोचू शकतो.

3 / 5
काहींनी या चित्रपटाला ट्रोलसुद्धा केलं आहे. या ट्रोलिंगवर आता प्रवीण तरडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जे देव मानत नाहीत त्यांना हा चित्रपट जास्त झोंबलाय. माझ्या देवाचा उदो-उदो मीच करणार. त्यामुळे माझ्या देवांचा उदो-उदो केला आणि कोणाला त्रास झाला याबद्दल मला काही देणं-घेणं नाही. उलट मी जास्त आनंदी झालो, म्हणजे तिर निशाने पे लगा है', अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.

4 / 5
या चित्रपटात प्रवीण तरडेंनी पत्नीलाच संधी दिली, अशीही टीका होत असताना ते म्हणाले, "माझं करिअर, माझा संसार उभा राहावा यासाठी स्नेहलने तिच्या कारकिर्दीचा त्याग केला. त्यामुळे आज जर मी तिला एखाद्या चित्रपटात संधी दिली, तर त्याच चुकीचं काहीच नाही. ज्याच्याकडे पात्रता नाही, त्याला संधी देणं म्हणजे नेपोटिझ्म."

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार