Maharashtra HSC 12th Result 2026 : पम्या, पिंकी पास होणार की नापास? कसं चेक कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप डिटेल्स

महाराष्ट्र बोर्ड बारावी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहेत. १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आणि दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येईल. mahresult.nic.in सह इतर संकेतस्थळांवर विद्यार्थी तात्पुरती गुणपत्रिका डाउनलोड करू शकतील, जी पुढील प्रवेशांसाठी महत्त्वाची ठरेल.

Maharashtra HSC 12th Result 2026 : पम्या, पिंकी पास होणार की नापास? कसं चेक कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप डिटेल्स
| Updated on: May 01, 2026 | 9:57 AM

सर्व विद्यार्थ्यांच्या आयु्ष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा. 2026 या सालच्या परीक्षा तर पार पडल्या, आता विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे ती निकालीच. त्यातच आता 12 वीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची धडधड, त्यांची उत्सुकता वाढली आहे. उद्या, म्हणजेच शनिवार, 2 मे रोजी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे.

फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, 12 वी आणि 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 15 लाख 32 हजार 487 द्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निकाल उद्या लागणार असून 2 मे रोजी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्याममध्ये निकालाची सविस्तर माहिती देण्यातयेईल, विभागीय निकाल किती टक्के लागला हेही सांगण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटव विद्यार्थ्याना निकाल पाहता येणार आहे.

कुठे पाहता येणार निकाल

दरवर्षीप्रमाणे 12 वीच्या लाखो विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागलं आहे. . बारावीच्या निकालाबद्दल चर्चा सुरू असतानाच आता बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीचा निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाइन तपासता येईल. ही तुमची तात्पुरती गुणपत्रिका म्हणून काम करेल. जोपर्यंत तुम्हाला छापील प्रत मिळत नाही, तोपर्यंत हीच मार्कशीट सर्वत्र उपयोगी पडेल. ॲडमिशन, स्कॉलरशिप आणि इतर कामांसाठी या या मार्कशीटचा वापर करता येऊ शकतो.

खालील दिलेल्या वेबसाईट्सवर विद्यार्थी त्यांचा निकाल चेक करू शकतील

mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

या वेबसाईट्सवर देखील विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतील.

Follow Us