पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून झोपेतच डोक्यात दगडी पाटा घालून हत्या

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : दगडी पाटा डोक्यात घालून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे घडली. चारित्र्याच्या संशयावरून पती प्रकाश धांडे याने 32 वर्षीय पत्नीचा जीव घेतला, असा आरोप करण्यात आलाय. घारगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी प्रकाशला पोलिसांनी तात्काळ अटक करून खुनाचा गुन्हा …

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून झोपेतच डोक्यात दगडी पाटा घालून हत्या

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : दगडी पाटा डोक्यात घालून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे घडली. चारित्र्याच्या संशयावरून पती प्रकाश धांडे याने 32 वर्षीय पत्नीचा जीव घेतला, असा आरोप करण्यात आलाय. घारगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी प्रकाशला पोलिसांनी तात्काळ अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मूळचे अकोले तालुक्यातील आंबेवंगन गावचं हे कुटुंब नोकरीनिमित्त दुसरीकडे वास्तव्यास होतं. तेथे एका खासगी शाळेत प्रकाश शिपाई, तर पत्नी स्वयंपाकीन म्हणून कामास होती.

अकोले येथे आज आजीचा दशक्रीया विधी असल्याने प्रकाश धांडे हा त्याच्या पत्नीसोबत रात्री जवळे बाळेश्वर येथे साडू बाळू घोडे यांच्याकडे आला होता. प्रकाश धांडे आणि पत्नीचं रात्री भांडण झालं. त्यानंतर समजूत घालून दोघेही शांत झाले.

बायको घराच्या खोलीत झोपली असताना आरोपी प्रकाशने पहाटे दोन वाजेच्या सुमारास घरात असलेला दगडी पाटा शांताच्या डोक्यात घातला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने शांता जागीच गतप्राण झाली. सकाळी घटनेची माहिती कळताच घारगाव पोलिसांनी आरोपी प्रकाशला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला.

अधिक तपास घारगाव पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे प्रकाश हा घारगाव येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार नामदेव धांडे यांचा मुलगा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *