AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा आणि लोकसभा एकत्र होणार का? मुख्यमंत्री म्हणतात…

नागपूर : लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना नागपुरात विचारण्यात आला. पण लिहून देतो, महाराष्ट्राची होणार नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. काही दिवसात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यापूर्वी […]

विधानसभा आणि लोकसभा एकत्र होणार का? मुख्यमंत्री म्हणतात...
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

नागपूर : लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना नागपुरात विचारण्यात आला. पण लिहून देतो, महाराष्ट्राची होणार नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

काही दिवसात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राज्याची विधानसभाही भंग करुन लोकसभेसोबतच निवडणूक होईल, असा अंदाज लावला जात आहे. महाराष्ट्रासोबतच हरियाणा विधानसभेची निवडणूकही होत असते. पण महाराष्ट्राची निवडणूक लोकसभेसोबत होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेची आचारसंहिता लागण्याअगोदर राज्य मंत्रीमंडळाची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक होत आहे. गेल्या बैठकीत 25 निर्णय घेण्यात आले होते, तर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत 50 पेक्षा जास्त निर्णय घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं.

गेल्या सहा दिवसांपासून सरकारच्या वरिष्ठ पातळीवर विधानसभा एकत्र घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुप्तचर खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली. भाजपचा लोकसभेबरोबर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्याची माहिती असून, भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघांसाठी सरासरी 10 कोटींचा निधी गेल्या काही दिवसात दिला गेला. शिवाय, राज्यातल्या अनेक मोठ्या कामांच्या उद्घाटनांचा गेल्या दहा दिवसात सपाटा लावण्यात आला आहे.

2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा होता?

भारतीय जनता पार्टी : 122

शिवसेना : 63

काँग्रेस : 42

राष्ट्रवादी काँग्रेस : 41

बहुजन विकास आघाडी : 3

शेतकरी कामगार पक्ष : 3

ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) : 2

भारिपा बहुजन महासंघ : 1

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी : 1

महाराष्ट्र नवनिर्माण सेना : 1

राष्ट्रीय समाज पक्ष : 1

समाजवादी पार्टी : 1

अपक्ष : 7

Follow Us
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन