AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या जरा सांभाळूनच राहा… महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशासहीत 20 राज्यात थेट… IMD चा अलर्ट काय?

Rain Alert 20 States : 23 ऑगस्ट रोजी छत्तीसगड आणि ओडिशामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच याशिवाय मध्य प्रदेश, विदर्भ, झारखंड या भागातही पावसाची शक्यता आहे.

उद्या जरा सांभाळूनच राहा... महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशासहीत 20 राज्यात थेट... IMD चा अलर्ट काय?
Heavy Rain alert for 20 StatesImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 22, 2026 | 4:45 PM
Share

भारताच्या विविध भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. तसेच पर्वतीय प्रदेशात सायक्लोनिक सर्क्युलेशन सुरू असून यामुळे मध्य, पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा कहर पहायला मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

20 राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी छत्तीसगड आणि ओडिशामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच याशिवाय मध्य प्रदेश, विदर्भ, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, किनारी कर्नाटक, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यातील काही भागात जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि तामिळनाडू-पुडुचेरीमध्ये 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह वीज कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीत कसे असेल हवामान?

राजधानी दिल्लीमध्ये 23 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ असेल. सकाळपासून दुपारपर्यंत काही भागांत अतिशय हलक्या ते हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे राजधानीत सध्या मुसळधार पावसाची शक्यता कमी असली तरी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होणारा पाऊस नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा देऊ शकतो.

उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम

उत्तर प्रदेशात मान्सून अद्याप सक्रिय आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 22 ते 25 ऑगस्टदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 23 ऑगस्ट रोजी पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशातही 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMDच्या मते, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ शकतो; मात्र पूर्व उत्तर प्रदेशात 25 ऑगस्टपर्यंत हवामान सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश आणि विदर्भातही पावसाचा जोर

मध्य प्रदेशात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील काही दिवस देशाच्या हवामानावर परिणाम करणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 22 ते 25 ऑगस्ट आणि पूर्व मध्य प्रदेशात 23 ते 26 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात 23 आणि 24 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर छत्तीसगडमध्ये 24 ते 28 ऑगस्टदरम्यान पावसाचा जोर कायम राहू शकतो. मध्य भारतातील सक्रिय हवामान प्रणालीमुळे अनेक भागांतील नद्या आणि नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि स्थानिक प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान