Nashik ZP | झेडपीतले कारभारी वाढणार; गटात 11 आणि गणात 22 ची वाढ, तरण्याबांड नेतृत्वाला संधी…!

| Updated on: Dec 08, 2021 | 10:06 AM

राजकारणातले पहिले मोठे पाऊल म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. सरंपच झाल्यानंतर महत्त्वकांक्षी नेतृत्वाला झेडपीचे (ZP ) वेध असतातच. त्यामुळे राजकारणातल्या तरण्याबांड नेतृत्वासाठी एक आनंदाची बातमी.

Nashik ZP | झेडपीतले कारभारी वाढणार; गटात 11 आणि गणात 22 ची वाढ, तरण्याबांड नेतृत्वाला संधी...!
Zilla Parishad, Nashik.
Follow us on

नाशिकः राजकारणातले पहिले मोठे पाऊल म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. सरंपच झाल्यानंतर महत्त्वकांक्षी नेतृत्वाला झेडपीचे (ZP ) वेध असतातच. त्यामुळे राजकारणातल्या तरण्याबांड नेतृत्वासाठी एक आनंदाची बातमी. होय, नाशिक जिल्हा परिषदेचा परीघ विस्तारणार असून, आता गट चक्क 11 आणि गण 22 ने वाढणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राजकारणात पाय ठेवायला संधीही जास्त राहणार आहे. मग काय, आत्तापासूनच लागा कामाला. घोडा मैदान जवळ आलंय. खरंय ना?

का वाढल्यात जागा?

नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. मात्र, या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 ते 40 लाखांच्या घरात लोकसंख्या आहे. हे पाहता राज्य सरकारने महापालिकेच्या जागा वाढवल्या. महापालिकेत सध्या 122 नगरसेवक होते. आता त्यांची संख्या 133 अशी करण्यात आली. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या जागाही वाढवण्यात येत आहेत.

कसा होणार बदल?

नाशिक शहरी भागासाठी 2 महापालिका, 8 नगरपालिका, 7 नगरपंचायती आहेत. मात्र, ग्रामीण भागाचा गावगाडा एकट्या जिल्हा परिषदेवर सुरू असतो. ग्रामीण भागात 2011 मधील जनगणनेनुसार 34 लाख 99 हजार 792 लोकसंख्या होती. त्यात साधरणतः पाच टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा विकास कामे साऱ्यांची जबाबदारी ही वाढली. हे पाहता जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या नाशिक जिल्हा परिषदेत सध्या 76 गट आणि 146 गण आहेत.

कुठे वाढणार गट?

नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, येवला, बागलाण तालुक्यांमध्ये गटांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पंचायत समित्यांची निवडणूक होते. एका गटात दोन गण असतात. या दोन्ही निवडणुकांना वेगवेगळे मतदान करावे लागते. जिल्ह्यात ओझरची ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे आपसुकच हा गट येणाऱ्या काळात रद्द होईल.

कधी होईल निवडणूक?

नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक पुढी वर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. सध्या निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे काम करण्याची सूचना केली आहे. याच काळात महापालिका निवडणूक आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि कोरोनाचा ओमिक्रॉन विषाणू पाहता, या निवडणुका वेळेत होतील की पुढे ढकलल्या जातील हे पाहावे लागेल.

इतर बातम्याः

Omicron| नाशिकमध्ये 45 टक्के नागरिकांची लसीकरणाकडे पाठ, प्रशासनाचे धाबे दणाणले

Nashik| नाशिकमधील सुप्रसिद्ध खंडेराव महाराजांच्या नवरात्रोत्सवाची उद्या सांगता…!