AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; विधान परिषदेच्या जागा वाटपानंतर भाजप, राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का, महायुतीमधून मोठी बातमी

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी बंडखोरी उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; विधान परिषदेच्या जागा वाटपानंतर भाजप, राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का, महायुतीमधून मोठी बातमी
eknath shindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 01, 2026 | 3:43 PM
Share

राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 18 जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर सोमवारी 1 जून रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज गर्दी केली आहे. दरम्यान दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची फायनल यादी समोर येताच आता महायुतीमध्ये मोठी बंडखोरी उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

गेले अनेक दिवस महायुतीमध्ये विधान परिषद निडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. 17 पैकी तब्बल 14 विधान परिषद मतदारसंघात भाजपाचं बहुमत आहे. त्यामुळे भाजपानं 14 जागा लढवाव्यात असं भाजपमधील काही नेत्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने 6 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3 जागा हव्या होत्या. शेवटी चर्चेअंती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला.  या फॉर्म्युल्यानुसार भाजपला सर्वाधिक 11 जागा शिवसेना शिंदे गटाला 4 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा मिळाल्या. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

जागा वटापाच्या फॉर्म्युल्यानंतर यवतमाळची जागा ही अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. मात्र यवतमाळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा महायुतीमधील दोन्ही पक्षांकडून बंडखोरी करण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी करत भाजपकडून नितीन भुतडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आदेश दिला म्हणून आपण अर्ज दाखल केला असा दावा यावेळी भुतडा यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी असं देखील म्हटलं आहे, की  जर  महायुतीत जागा शिवसेनेला सुटली असेल तर अमही युती धर्म पाळू. तर दुसरीकडे या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून साजिद बेग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल