
उल्हासनगर : काली (Kali) चित्रपटाच्या पोस्टरवरून संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरातही ब्राह्मण समाज (Brahmin Society) आणि तृतीयपंथीयां (Transgender)मध्येही नाराजी पसरली आहे. हा चित्रपट तयार करणाऱ्या फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी केली आहे. भारतीय वंशाच्या फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांनी कॅनडामधील टोरंटो शहरात असलेल्या आगा खान म्युझियममध्ये ‘रिद्म्स ऑफ कॅनडा’ या सेगमेंटमध्ये ‘काली’ चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केलं. या पोस्टरमध्ये काली माता एका हाताने सिगरेट पिताना, तर दुसऱ्या हातात एलजीबीटी कम्युनिटीचा झेंडा घेतलेली दाखवली आहे. यावर ब्राम्हण समाज आणि तृतीयपंथीयांमधून तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
Super thrilled to share the launch of my recent film – today at @AgaKhanMuseum as part of its “Rhythms of Canada”
Link: https://t.co/RAQimMt7LnI made this performance doc as a cohort of https://t.co/D5ywx1Y7Wu@YorkuAMPD @TorontoMet @YorkUFGS
Feeling pumped with my CREW❤️ pic.twitter.com/L8LDDnctC9
— Leena Manimekalai (@LeenaManimekali) July 2, 2022
काली चित्रपटाच्या पोस्टरबाबत ऑनलाईन नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर भारतात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. तर दुसरीकडे कॅनडामधील भारतीय दूतावसानेही या म्युझियमला प्रक्षोभक गोष्टींचा समावेश न करण्याची मागणी केली. एकीकडे कॅनडात या घडामोडी सुरू असतानाच उल्हासनगरात ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी एकत्र येत लीना मणीमेकलाई यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिलं. यामध्ये लीना मणीमेकलाई विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हा गदारोळ पाहून फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांनी याबाबत ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. हा चित्रपट एक दिवस काली माता टोरंटो शहराच्या रस्त्यावर अवतरते आणि त्यानंतर तिच्या आजूबाजूला काय गोष्टी घडतात यावर अवलंबून आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यानंतरही ट्विटरवर अरेस्ट लीना मणीमेकलाई नावाचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. (In Ulhasnagar, Brahmin community and third parties protest over Kali movie poster)