राज्यावर संकट! गारपिटीसह जोरदार पावसाला सुरूवात, पुढील 24 तास धोक्याचे…

मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी उन्ह तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा अलर्ट जारी केला. राज्यातील अनेक भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

राज्यावर संकट! गारपिटीसह जोरदार पावसाला सुरूवात, पुढील 24 तास धोक्याचे...
Rain
| Updated on: Mar 18, 2026 | 11:30 AM

भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली. पुढील तीन दिवस राज्यात पाऊस कायम राहणार आहे. आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. आज नागपूर सह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा दिलेला इशारा फेल ठरल्यानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. सध्या नागपूरसह विदर्भात उन्हाचे चटके बसत असताना पुढचे दोन दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

अमरावती सह पश्चिम विदर्भातही पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला. आज सकाळपासून अमरावतीसह ग्रामीण भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे. अनेक भागांमध्ये हलक्या सरी बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. अवकाळी पावसाचा हरभरा आणि गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता.

गडचिरोलीत विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. हवामानात अचानक बदल झाले असून एकीकडे उष्णतेची लाट सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने राज्यातील काही भागात 18 ते 20 मार्च असे 4 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गडचिरोली जिल्ह्यात 18 मार्च रोजी पहाटे साडेचार वाजतापासून वादळी पावसाने हजेरी लावली. विजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने बत्ती गुल झाली.

गडचिरोली जिल्ह्यात पहाटे साडेतीन ते चार वाजेपर्यंत 15 ते 20 मिनिटांच्या पाऊस आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. जिल्ह्यात थंडगार वादळ सुरू असून भर उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आहेरी भामरागड सिरोंचा चामोर्शी या भागात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला

सांगली जिल्ह्यात मिरज पूर्व भागात काल वादळी वाऱ्यासह गारांचा प्रचंड पाऊस पडला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरज बेडग रोड वरील शाळूचे पीक अक्षरश भुईसपाट झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला असून या पावसाने आंबा, गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. लातूर, निलंगा, औसा, चाकुर,रेणापूर, देवणी ,उदगीर ,अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, भागात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला आहे. धाराशिवच्या लोहारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका. हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us