AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Alert : महाराष्ट्रावर गारपीटचे संकट, तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, घरातून बाहेर पडणे टाळा..

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला असून गारपीटने मोठे नुकसान झाले. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. काल राज्यातील अनेक भागात मोठी गारपिट झाली.

IMD Weather Alert : महाराष्ट्रावर गारपीटचे संकट, तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, घरातून बाहेर पडणे टाळा..
Rain
| Updated on: Mar 18, 2026 | 7:16 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. ऐन मार्च महिन्यात राज्यात पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. आजही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. मागील काही महिन्यापासून पाऊस सतत पडत आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होताना दिसत आहे. आज राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होण्याची यंदाज आहे. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. आज राज्यातील काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले.

सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोदिंया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल. यावेळी विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल. या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

काल झालेल्या पावसाने अनेक भागात मोठी गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सांगली शहरासह मिरज तालुक्यात गारपीट. शहरात वादळी वाऱ्यासह तुफानी गारपीट. मिरज पूर्व भागामध्ये ही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बेडग व आरग सह परिसरात गारांचा तुफानी पाऊस विजांच्या कडकडाटा सह वादळी वारा व गारपीट. सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्य रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हळद ,गहू उत्पादकांची उडाली धांदल. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावामुळे शेतकरी चिंतेत.अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. अक्कलकोट शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु. घोळसगाव, बोरगाव दे गावातील शेतीला गारपीटी फटका बसण्याची शक्यता. तालुक्यातील गहू, ज्वारी आणि द्राक्ष पिकांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा धोका. जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी