AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Alert : गारपिटीचे पुन्हा संकट! 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, पुढील काही तास धोक्याचे…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांकरिता गारपिटीसह पावसाचा मोठा इशारा दिला. आजही राज्याती काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

IMD Weather Alert : गारपिटीचे पुन्हा संकट! 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, पुढील काही तास धोक्याचे...
Rain
| Updated on: Mar 17, 2026 | 7:20 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने चढउतार बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 4 दिवसांकरिता मोठा इशारा दिला. राज्यात एकीकडे उष्णतेचा चटका वाढला आहे तर दुसरीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील जवळपास भागात पुढील चार दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. यादरम्यानच अनेक भागात उष्णता वाढण्याचेही संकेत आहेत. मार्च महिन्याला सुरूवात झालेली असतानाही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सतत पाऊस सुरू आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावण्याचा अंदाज आहे. गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे पिक काढले जात असतानाही पावसाने हजेरी लावली. कृषी विभागानेही पुढील 4 दिवसांपासून शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला.

भारतीय हवामान विभागाने नांदेड, सोलापूर, लातूर, नागपूर, भंडारा, गोदिंया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागाता पावसाचा येलो अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा आज अंदाज आहे. बाकी उर्वरित राज्यात उकाडा असेल. देशातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. अमरावतीमध्ये उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

यासोबतच 20 मार्चपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यादरम्यान काही भागात गारपिट होण्याचाही अंदाज आहे. कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. गुरूदासपूरमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला.

थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात आता उन्हाचा चटका जाणवू लागला असून कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. निफाड येथे आज कमाल 38.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून नागरिक उष्णतेने हैराण झाले उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक रसवंतीगृह तसेच शीतपेयीच्या दुकानात मोठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसत बघायला मिळत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी