महाराष्ट्रातील या भागात कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, अखेर हवामान विभागाने..

Maharashtra Rain Alert : ज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यातच आज हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

महाराष्ट्रातील या भागात कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, अखेर हवामान विभागाने..
Heavy Rain Maharashtra
| Updated on: Sep 29, 2026 | 8:24 AM

राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला. स्थिती अनेक जिल्ह्यात गंभीर आहे. शेतकरी राजा संकटात आहे. पिके हातून गेली आहेत. एल निनोचा प्रभाव राज्यातील मॉन्सूनवर बघायला मिळाला. फक्त जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवली. राज्यात यंदा अपेक्षित पाऊस होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पावसाने पाठ फिरवली. दुष्काळाची विदारकता वाढत आहे. पिण्याचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे. फक्त यंदाच नाही तर 2027 मध्येही एल निनो अधिक सक्रिय होण्याचे संकेत आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यात मागील काही दिवसापासून पाठ फिरवलेला पाऊस पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची अंदाज आहे. पावसाचा मोठा इशारा दिला आहे. थोडातरी यामुळे लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या जिल्ह्यांमधून पावसाने माघार घेतली. अरबी समुद्रात 1.5 ते 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

Loading...

कर्नाटकपासून ते तामिळनाडूपर्यंत 900 मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णता वाढताना दिसतंय. राज्यात महाबळेश्वर येथे नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. महाबळेश्वर येथे 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा मोठा दिलासा म्हणावा लागेल.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी राजा अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे इथल्या दर्शनाला. शेतातील विदारक परिस्थिती शेताला पाणी नाही त्यामुळे शेत चालली करपून ही परिस्थिती सुधारण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे गणरायाला साकडे. जत तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी मांडली आपल्या शेतातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची व्यथा. पाण्याअभावी शेत देखील करपली, आता तरी गणरायांना कृपादृष्टी करावी अशी शेतकरी राजाची गणरायाला आर्टत हाक.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us