Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पावसाचा अंदाज, या दिवशी कोसळणार पाऊस, हवामान विभागाने..
Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उत्तरेकडील राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्याच मोठा इशारा आज देण्यात आला.

1 ते 6 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस झाला. जून महिना कोरडा गेला. तो पाऊस एकट्या जुलै महिन्यात झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली. आता पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली. उकाडा वाढला आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यात सध्या जरी पावसाने पाठ फिरवली असली तरीही पुन्हा धो धो पाऊस राज्यात सुरू होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. आता पावसाची प्रतिक्षा आहे. कोकणासह राज्यात जोरदार पाऊस येत्या चार ते पाच दिवसात हजेरी लावेल असा अंदाज आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा हिस्सार मेरठ, गोरखपूर ते आसामपर्यंत आहे. 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती राहिल. राज्यात बहुतांश भागात हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यासोबतच उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीच चांगलीच वाढ झाली. धरणातील पाणीसाठा संपत असतानाच पाणी पातळीत वाढ झाली. उत्तराखंडमध्ये मान्सूनचा जोर पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. भारतीय हवामान विभागाने 13 जुलैपासून पुढील काही दिवस राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
वायव्य मध्य प्रदेश आणि त्याला लागून असलेल्या नैऋत्य उत्तर प्रदेशाच्या भागात कमी दाबाचा एक अतिशय तीव्र पट्टा निर्माण झाला आहे. त्यामध्ये उत्तराखंडसह काही राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. हवामान तज्ज्ञांच्या मते, ही हवामान प्रणाली सुरुवातीला उत्तर-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर अचानक ईशान्य दिशेकडे वळेल.
महाराष्ट्रात आज वातावरण जवळपास कोरडे राहिल. दुपारच्यावेळी काही भागात उन्हाचा चटका अधिक जाणवेल. काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमधील आकाशात ढगांची दाटी झाली असून डोंगराळ भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नागरिकांना अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातोय.