दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, मोठं संकट, या जिल्ह्यात कोचिंग क्लासेससह..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उष्णता वाढत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे. पुढील काही तास राज्यासाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत.

दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, मोठं संकट, या जिल्ह्यात कोचिंग क्लासेससह..
Heat warning
| Updated on: Apr 26, 2026 | 7:52 AM

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. अकोल्यात 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी अकोला, अमरावती, चंद्रपूर उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. राज्य दुहेरी संकटात आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अत्यंत मोठा इशारा जारी केला.

गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची लाट असून याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो अकोलाकरांना बसत आहे. काल अकोलाचा तापमान 45 इतकं होत. सततच्या वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले.आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडावे, भरपूर पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यासोबतच आजपासून अनेक ठिकाणी शाळा आणि क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मालेगावात उष्णतेची तीव्रता वाढली असून 43.4°C तापमानाची नोंद झाली. एप्रिल महिन्यातील यंदाचे सर्वाधिक तापमान जुन्या नोंदी मोडल्या. कडक उन्हामुळे नागरिक हैराण दुपारी रस्ते ओस पडल्याचे चित्र. वाढत्या तापमानामुळे रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. दुपारी 12 ते 4 दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचना.

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे झेंडू फुलांच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून उष्णतेच्या तडाख्यामुळे फुलांची वाढ खुंटणे, कळ्या गळणे आणि फुलांची गुणवत्ता घसरणे असे परिणाम दिसून आले आहेत. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली असून बाजारातील आवकही कमी झाली आहे. त्यातच सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने झेंडू फुलांना मोठी मागणी निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us