
हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी थंडी अशी परिस्थिती आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे, पण त्या तुलनेत राज्यात शीतलहरी येत नाहीत. त्यामध्येच मुंबईसह काही प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण हा मोठा मुद्दा बनलंय. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना कोर्टाने वायू प्रदूषणाच्या मुद्द्यात चांगलेच फटकारे. मुंबईतील वायू प्रदूषण गंभीर मुद्दा बनले असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. घशात त्रास, श्वास घेण्यास समस्या, सर्दी, खोकला या सारख्या अनेक समस्या वायू प्रदूषणामुळे वाढल्या आहेत. श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. वातावरण बदल असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय. जानेवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागात पाऊस झाला आणि थंडी गायब झाली. डिसेंबर महिन्यात अधिक थंडी होती. मात्र, जवळपास गेली.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात गारठा वाढण्याचे संकेत आहेत. लुधियानामध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. लुधियानात 4.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अहिल्यानगरमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल.
राज्यातील किमान तापमानात चढउतार बघायला मिळेल. यासोबतच गारठा वाढण्याचेही संकेत आहेत. देशातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. पावसाचा मोठा अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 12 तासांत आठ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. फक्त पाऊसच नाही तर पावसासोबत चक्रीवादळही असेल. तब्बल 48 तास पाऊस राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानंतर अनेकांची झोप उडाली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, केरळ आणि तामिळनाडू या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एकीकडे थंडी तर दुसरीकडे तूफान पाऊस होणार आहे. मॉन्सून जाऊन अनेक महिने झालेले असताना पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही.