देशातील खासगी तेजस एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा, ट्रेन होस्टेससह अत्याधुनिक सुविधा

पश्चिम रेल्वे मार्गावर देशा़तील दुसरी खासगी तत्वावरील तेजस ट्रेन आजपासून (17 जानेवारी) सुरु (India private tejas express train launch) करण्यात आली आहे.

देशातील खासगी तेजस एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा, ट्रेन होस्टेससह अत्याधुनिक सुविधा
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 9:23 PM

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर देशा़तील दुसरी खासगी तत्वावरील तेजस ट्रेन आजपासून (17 जानेवारी) सुरु (India private tejas express train launch) करण्यात आली आहे. अहमदाबाद येथून सकाळी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून लाँन्च करण्यात आले. या ट्रेनमध्ये ट्रेन होस्टेससह आत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात (India private tejas express train launch) आल्या आहेत.

देशातील दुसरी खासगी तेजस एक्सप्रेस ट्रेन रेल्वे आणि IRTC या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सरु झाली. इंटेरिअर डेकोरेटे केलेली ही दुसरी खासगी रेल्वे सेवा असणार आहे. ज्यामध्ये सर्व ट्रेनला वाय-फाय सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरा, कॉफी मशीन, ऑटोमेटिक डस्टबीन, विंडो स्लाईडही असणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण 758 सिट्स असणार असून त्यामध्ये 56 Excutives Seats असणार आहेत. तर बाकीच्या एसी कार चेअर आहेत. Excutive cahir car – 2,384 तर Ac Cahir car साठी-1289 रुपये आकारण्यात येणार आहे.

Excutive cahir डब्यात काही आणखी वेगळ्या गोष्ठी देण्याचा प्रयत्न वेस्टर्न रेल्वे आणि IRTC कडून करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांची करमणूक म्हणून प्रत्येक चेअरच्या पाठीमागे एलीडी बसवण्यात आलेली आहे.

ज्याप्रमाणे तुम्ही विमानात प्रवास करताना तुम्हाला सोयीसुविधा देण्यासाठी जशा एअर हाँस्टेस असतात. त्याचप्रमाणे तेजसने प्रवास करताना तुम्हाला सोयीसुविधा पुरवण्यासाठी पारंपारिक वेशभुषेतील ट्रेन होस्टेसही ठेवल्या आहेत. ज्यामुळे ट्रेनमध्ये तुम्हाला विमानप्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

तेजस एक्स्प्रेसमध्ये महाराष्ट्रीय आणि गुजराती थाळी मिळणार आहे. यामध्ये गुजराती डाळ, गुजराती कडी, लसनिया बटाटा भाजी, फाफडा, जिलेबी असे गुजराती पदार्थ मिळणार आहेत. तसेच मांसाहारी पदार्थांसह बटाटा भाजी, बटाटावडा, कोथिंबिर वडी, श्रीखंड, कांदेपोहे अशा महाराष्ट्रीय पदार्थांची चवही चाखता येणार आहे.

सोयी सुविधांचा भरणा असेलेली ही तेजस एक्सप्रेस आठवड्यातून दररोज धावणार असुन 6.30 तासात ती मुंबई ते अहमदाबाद हे अंतर पार करणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.