Indorikar Maharaj Kirtan : इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द, तब्येतीच्या कारणास्तव ब्रेक

| Updated on: May 24, 2022 | 4:56 PM

आज इंदोकरांच्या चाहत्यांना निराश करणारी तसेच चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. कारण तब्येतीच्या कारणास्तवर इंदोरीकर महाराजांनी काही दिवस ब्रेक घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Indorikar Maharaj Kirtan : इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द, तब्येतीच्या कारणास्तव ब्रेक
इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द
Image Credit source: tv9
Follow us on

आपल्या महाराष्ट्राला किर्तनकारांची (Kirtan) एक मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने अनेक बडे किर्तनकार पाहिल आहे. निवृत्ती महाराज इंदोरीकर हेही त्यापैकीत एक किर्तनकार आहेत अलिकडच्या काळात किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indorikar Maharaj) प्रचंड गाजले. इंदोरीकर महाराजांची लोकप्रियता पाहून अनेकजण आवाक राहतात. इंदोरीकर महाराजांना ऐकायला अजूनही मोठी गर्दी जमते. इंदोरीकरांच्या भाषणातला तो विनोदी (Comedy) बाज आणि ग्रामीण हटके स्टाईल बोलणं अनेकांना भावतं. त्यामुळे त्यांच्या किर्तनच्या तारखा अनेकांना मिळता मिळत नाहीत, तसेच इंदोरीकरांच्या किर्तनाच्या तारखा महिनेच्या महिने पुढे बूक असातात. मात्र आज इंदोकरांच्या चाहत्यांना निराश करणारी तसेच चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. कारण तब्येतीच्या कारणास्तवर इंदोरीकर महाराजांनी काही दिवस ब्रेक घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

काही दिवस कार्यक्रम रद्द

इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डाॅक्टरांनी हा सल्ला इंदोरीकरांना दिला आहे.  हभप निवृती महाराज देशमुख यांचे अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम नियोजित होते. मात्र आता आयोजकांची गैरसोय होणार असल्याने इंदोरीकर महाराजांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे. तसे दिलगिरी व्यक्त करणारे पत्रकही त्यांच्याकडून काढण्यात आले आहेत. इंदोरीकरांचा हा ब्रेक खूप काळ नसणार आहे. ते पुन्हा सर्वासमोर किर्तनाला उभे राहताना दिसून येणार आहेत. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत असेल असे इंदोरीकरांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र काही दिवस तरी त्यांची किर्तन आता बंद असणार आहेत.

हे सुद्धा वाचा

इंदोरीकर अनेकदा वादतही सापडले

इंदोरीकर किर्तनाला उभे राहिले की अनेकदा टाळ्यांचा पाऊस पडतो. त्याला कारण म्हणजे त्यांच्या बोलण्यातला विनोदी भाव आणि परखड बोलणं. मात्र त्यांच्या याच बोलण्यामुळे ते अनेकदा वादतही सापडले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी इंदोरीकरांनी संततीप्राप्तीबाबत जे विधान केले होते. त्यावरून त्यांंच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच हे प्रकरण न्यायलयातही पोहचलं होतं. त्यानंतर पुन्हा पुण्यातही त्यांच्याविरोधात तक्रार झाली होती. अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ वाहिनीवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे म्हटल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे ते अनेकदा वादातही सापडल्याचे दिसून आले. मात्र तरीही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियता वाढत चालली आहे.